Staff Reduction: ‘या’ मोठ्या कंपनीने केली कर्मचारी कपात; कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार

कोविड- 19 साथीच्या काळात ग्राहकांच्या बदलेल्या सवयी आणि वर्क फ्रॉम होमच्या गुंतागुंतीमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीने सांगितले आहे.

127
Staff Reduction
Staff Reduction: 'या' मोठ्या कंपनीने केली कर्मचारी कपात; कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार

आर्थिक वाढ मंदावल्यामुळे जगभरातील अनेक बड्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून (Staff Reduction) काढून टाकलं आहे. मोठया कंपन्यांमधील कर्मचारी कपातीचे हे सत्र अजूनही सुरूच आहे. आता आणखी काही कंपन्यानी कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.

(हेही वाचा – Central Railway : रेल्वे प्रवासी आणि टीसी यांच्यातील वादावर मध्य रेल्वेने काढला तोडगा)

लठ्ठ पगाराच्या नोकरदारांना कंपनीचा दणका 

क्लाउड क्षेत्रातील वाढ मंदवल्यामुळे अमेरिका येथील सॅन फ्रॅनसिसको मधील ‘ड्रॉपबॉक्स’ ही कंपनी तब्बल १६ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून (Staff Reduction) काढून टाकणार आहे. २०२२ च्या अखेरीस कंपनीत ३११८ पूर्णवेळ कर्मचारी होते. त्यातील क्लाउड स्टोरेज व्यवसायातील ५०० कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार आहे.

मोठमोठ्या कंपनीत कर्मचारी कपात

ऑडियो अॅप क्लब हाऊसने अर्ध्यापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना (Staff Reduction) घरी बसवले आहे. कोविड- 19 साथीच्या काळात ग्राहकांच्या बदलेल्या सवयी आणि वर्क फ्रॉम होमच्या गुंतागुंतीमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीने सांगितले आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये कंपनीमध्ये सुमारे १०० कर्मचारी होते.

तसेच अॅमेझॉनची उपकंपनी असलेल्या अॅमेझॉन स्टुडियो आणि प्राइम व्हिडीओ डिव्हीजनमध्ये कर्मचारी कपात (Staff Reduction) केली जात आहे. १०० कर्मचारी काढले जाण्याची शक्यता आहे. या क्षेत्रातील नामांकित कंपनी वॉल्ट डिझनीने यापूर्वीच ७ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.