Vajramooth Sabha : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून बीकेसीमध्ये मविआच्या ‘वज्रमूठ’ सभेचे आयोजन

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ही सभा असल्याने ठाकरे गटाने ही सभा यशस्वी करण्याकरिता जय्यत तयारी केली आहे.

111
Vajramooth Sabha
Vajramooth Sabha : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून बीकेसीमध्ये मविआच्या 'वज्रमूठ' सभेचे आयोजन

राजकारणात सध्या अनेक गोष्टी घडत आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि ठाकरे गट जनतेपर्यंत आपली भूमिका मांडण्यासाठी वेगवेगळ्या सभा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ (Vajramooth Sabha) सभा सोमवार १ मे रोजी वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे होणार आहे.

(हेही वाचाShivsena On Ajit Pawar: लवकरच अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार: शिवसेना नेत्याचा दावा)

यापूर्वी ‘वज्रासभा’ (Vajramooth Sabha) सभेतील मालिकेतल्या दोन सभा संपन्न झाल्या आहेत. अशातच आता छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरनंतर तिसरी जाहीर सभा महाराष्ट्रदिनी म्हणजेच १ मे रोजी संध्याकाळी होणार आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ही सभा असल्याने ठाकरे गटाने ही सभा यशस्वी करण्याकरिता जय्यत तयारी केली आहे. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईच्या सभेला उपस्थित राहून मार्गदर्शन करावे, असा ठाकरे गटाचा प्रस्ताव होता. मात्र शरद पवार हे राज्यपातळीवरील मेळाव्यांना उपस्थित राहणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

हेही पहा

या सभेत प्रत्येक पक्षाचे दोन – दोन नेते भाषण करतात. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर राष्ट्रवादी पक्षाकडून छगन भुजबळ व जितेंद्र आव्हाड हे दोन नेते भाषण करणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच काँग्रेस पक्षाकडून कोणते दोन नेते भाषण करणार आहेत यावर अजून काही निर्णय झालेला नाही. त्यामुळे मुंबईचे अध्यक्ष म्हणून भाई जगताप आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाषण करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Vajramooth Sabha)

या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार भाषण करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.