Central Railway : रेल्वे प्रवासी आणि टीसी यांच्यातील वादावर मध्य रेल्वेने काढला तोडगा

व्हिडिओ रेकॉर्डिंग जवळपास महिनाभर साठवून ठेवण्यात येणार आहे.

130
Central Railway
Central Railway : रेल्वे प्रवासी आणि टीसी यांच्यातील वादावर मध्य रेल्वेने काढला तोडगा

रेल्वे प्रवासात अनेकदा प्रवासी आणि टीसी यांच्यात वाद होतांना आपण पाहतो. यावेळी काही प्रवाशांच्या तोंडावर ताबा राहत नाही. पण आता यापुढे प्रसवी यांनी टीसी सोबत वाद घालतांना थोडं जपून, नाहीतर प्रवाशांना तुरुंगात जावे लागेल. कारण मध्य रेल्वेने तिकीट तपासणीस यांना बॉडी कॅमेरे देण्याचा निर्णय घेतला असून या कॅमेरात तुम्ही टीसीसोबत भांडतांना कोणती भाषा वापरली याचे रेकॉर्ड होणार आहे. तसेच हे रेकॉर्ड तुमच्या विरुद्ध पुरावा ठरू शकते. (Central Railway)

(हेही वाचा – स्वस्तात फिरा नेपाळ! IRCTC च्या पॅकेजमध्ये मिळणार अनेक सवलती)

मुंबईतील उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये (Central Railway) तिकीट तपासणी आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या मध्ये शाब्दिक चकमक उडते. हे प्रकरण वरिष्ठ अधिकारी यांच्यापर्यत किंवा पोलीस ठाण्यापर्यत गेल्यावर दोघांकडून एकमेकांवर आरोप केले जाते. बऱ्याच वेळा प्रवाशांकडून मोबाईल फोन मध्ये हा प्रसंग कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केला जातो, आणि विनाकारण टीसीला त्याची शिक्षा भोगावी लागते. हे प्रसंग टाळण्यासाठी मध्य रेल्वेने या उपाय शोधून काढला आहे.

मध्य रेल्वेच्या (Central Railway) उपनगरीय स्थानकावर तसेच लोकल ट्रेनमध्ये एकूण १२०० तिकीट तपासनीस आहेत. त्यापैकी प्रायोगिक तत्वावर ५० तिकीट तपासणीस यांना बॉडी कॅमेराचे वाटप करण्यात आले आहे.”पारदर्शकता राखण्यासाठी आणि तिकीट तपासणी बाबतचा गोंधळ दूर करण्यासाठी” रेल्वेने टीसींना बॉडी कॅमेऱ्यांनी सुसज्ज करण्याचा निर्णय घेतला असल्याचे एका वरिष्ठ रेल्वे अधिकारी यांनी सांगितले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओ रेकॉर्डिंग जवळपास महिनाभर साठवून ठेवण्यात येणार आहे. तिकीट तपासणी मध्ये काही विसंगती आढळल्यास किंवा प्रवाशांच्या तक्रारी असल्यास वरिष्ठ अधिकारी व्हिडिओचे पुनरावलोकन करतील.

हेही पहा

हे कॅमेरे हाय-डेफिनिशन व्हिडिओ आणि स्पष्ट ऑडिओ कॅप्चर करण्यास सक्षम आहेत. ते स्थिर छायाचित्रे देखील घेऊ शकतात. ते नाईट-व्हिजन तंत्रज्ञानानेही सुसज्ज असतील. यामुळे तिकीट-तपासणी कर्मचार्‍यांची क्षमता वाढेल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल,” असे आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले. (Central Railway)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.