छत्रपती संभाजी महाराजानंतर मुघलांना यश मिळू न देणारे छत्रपती Rajaram Maharaj

145
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यांनी आपले स्वराज्य खूप चांगलं सांभाळलंही. त्यांच्यानंतर ही जबाबदारी छत्रपती संभाजी महाराज यांनी उत्तमरीत्या निभावली. पण छत्रपती संभाजी राजांच्या निघृण हत्येनंतर मराठी स्वराज्याचा कणा जवळजवळ मोडूनच पडला होता. पण त्यावेळेस स्वराज्याचे छत्रपती म्हणून राजाराम महाराजांना (Rajaram Maharaj) सिंहासनावर बसवण्यात आलं.
छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म २४ फेब्रुवारी १६७० साली झाला. ते लहानपणापासूनच शांत आणि गंभीर स्वभावाचे होते. छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली त्यावेळी त्यांचे औरस वारस शाहु राजे हे फक्त सात वर्षांचे होते. म्हणून महाराणी येसूबाई यांनी स्वतः गादीवर न बसता राजाराम महाराजांचा अभिषेक करण्यास सांगितलं. त्यानुसार राजाराम महाराजांना (Rajaram Maharaj) सिंहासनावर बसवण्यात आलं. १० जून १६८९ साली राजाराम महाराजांनी आपल्या आयुष्यातली पहिली लढाई लढली. ही लढाई लढण्यासाठी त्यांना सरनौबत नरवीर चिमाजी गोळे यांनी मोलाची साथ दिली आणि मराठ्यांनी काकरखान सारख्या मुघलाला धूळ चारली.

राजाराम महाराज आणि पत्नी ताराराणी यांनी मुघलांना यश येऊ दिले नाही 

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यातील बराचसा भाग मुघलांच्या अंमलाखाली आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी बंद केलेली वतनदारीची पद्धत परत डोकं वर काढायला लागली होती. वतनदारीचं आमिष दाखवून मुघलांनी अनेकांना आपल्या बाजूने वळवलं होतं. अशा कठीण काळात राजाराम महाराज (Rajaram Maharaj) आणि त्यांच्या पत्नी ताराराणी यांनी मुघलांना स्वराज्य काबीज करण्यात यश येऊ दिलं नव्हतं.
धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे हेही सरदार होते. पण यांना वतनदारीपेक्षा स्वराज्याशी एकनिष्ठ राहायचं होतं. या दोन्ही सरदारांनी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच गनिमी कावा करून मुघलांवर हल्ले करायला सुरुवात केली. जुल्फिकार खानाने जेव्हा जिंजीवर हल्ला केला होता तेव्हा राजाराम महाराजांनी (Rajaram Maharaj) धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे या दोन्ही सरदारांना बोलावणं धाडलं. तेव्हा त्यांनी तात्काळ कर्नाटकात येऊन झुल्फिकार खानच्या फौजेचा धुव्वा उडवत जिंजीच्या आजूबाजूचाही परिसर जिंकून घेतला. सतत होणारी धावपळ, स्वाऱ्या यांमुळे राजाराम महाराज सतत आजारी राहू लागले. मग पुढे कालांतराने त्यांचे निधन झाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.