Paytm Crisis : रिझर्व्ह बँकेची पेटीएम प्रकरणात आणखी ताठर भुमिका

पेटीएम युपीआय व्यवहारांसाठी थर्ड पार्टी बँक निवडण्याच्या प्रक्रियेवर एनसीपीआयने लक्ष ठेवण्याचे रिझर्व्ह बँकेचे निर्देश. 

120
Paytm Crisis : रिझर्व्ह बँकेची पेटीएम प्रकरणात आणखी ताठर भुमिका
  • ऋजुता लुकतुके

पेटीएम (Paytm Crisis) कंपनीचा आता आटापिटा सुरू आहे तो आपलं युपीआय ॲप सुरू ठेवण्यासाठी. कारण, त्यासाठीही कंपनीला थर्ड पार्टी बँकेची मदत लागणार आहे. आतापर्यंत पेटीएमवर युपीआय मार्फत होणारे व्यवहार हे पेटीएम पेमेंट्स बँकेच्या मध्यस्थीने होत होते. आता पेमेंट्स बँकेवर संक्रांत आल्यावर पेटीएम युपीआय ॲपसाठी कंपनीला नवीन थर्ड पार्टी बँक शोधावी लागणार आहे. ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक असा अग्रणी बँका त्यासाठी उत्सुकही आहेत. पण, रिझर्व्ह बँकेनं या प्रक्रियेतही नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयला लक्ष घालायला सांगितलं आहे. (Paytm Crisis)

पेटीएमच्या सगळ्या ग्राहकांचं नवीन प्रणालीवर स्थानांतरण व्हावं आणि यात ग्राहकांचं नुकसान होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात येत आहे. पेमेंट्स बँकेकडून ग्राहकांची खाती इतर बँकांकडे गेली आहेत की नाही, हे एनपीसीआयने जातीने पहावं असं रिझर्व्ह बँकेनं सांगितलं आहे. तर पेटीएमला (Paytm Crisis) आधीच्या ग्राहकांचं स्थानांतरण झाल्याशिवाय नवीन ग्राहक स्वीकारू नयेत असं बजावण्यात आलं आहे. आणि ही प्रक्रिया नीट पार पडते की नाही, किंवा ती कशी पार पडते यावर एनसीपीआयची कडक नजर राहणार आहे. (Paytm Crisis)

(हेही वाचा – Byju Raveendran : बायजू समभागधारकांनी बोलावलेल्या बैठकीत रवींद्रन यांची हकालपट्टी करण्याच ठराव मंजूर)

‘तो’ अर्ज देणे हे एनसीपीआयच्या हातात

३१ जानेवारीला रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेवर निर्बंध लागू केले. १५ मार्चपासून पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ठेवी किंवा मुदतठेवी स्वीकारता येणार नाहीएत. तसंच वॉलेट्स, फास्टटॅग अशा खात्यांमध्ये पैसे जमा करून घेता येणार नाहीएत. पेटीएम युपीआय ॲप सुरू ठेवण्यावर मध्यवर्ती बँकेचा काही आक्षेप नसला तरी या ॲपवरील व्यवहार पेमेंट्स बँकेच्या मध्यस्थीने होतात. आणि ही बँक आता अकार्यक्षम असल्याने पेटीएमने (Paytm Crisis) युपीआय व्यवहार सुरू ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे थर्ड पार्टी परवान्यासाठी अर्ज केला आहे. तो अर्ज देणं हे एनसीपीआयच्या हातात आहे. (Paytm Crisis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.