Byju Raveendran : बायजू समभागधारकांनी बोलावलेल्या बैठकीत रवींद्रन यांची हकालपट्टी करण्याच ठराव मंजूर

Byju Raveendran : बायजूच्या काही गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन शुक्रवारी एक बैठक बोलावली होती.

123
Byju Raveendran : बायजू समभागधारकांनी बोलावलेल्या बैठकीत रवींद्रन यांची हकालपट्टी करण्याच ठराव मंजूर
Byju Raveendran : बायजू समभागधारकांनी बोलावलेल्या बैठकीत रवींद्रन यांची हकालपट्टी करण्याच ठराव मंजूर

ऋजुता लुकतुके

बायजू कंपनीच्या (Byju Raveendran) काही निवडक भागधारकांनी शुक्रवारी बोलावलेल्या बैठकीत कंपनीचे सीईओ म्हणून रवींद्रन (Rabindran) यांची हकालपट्टी करण्याचा ठराव मंजूर केला आहे. या भागधारकांमध्ये प्रोसस, जनरल ॲटलांटिक आणि पीक एक्सव्ही सारखे मोठे आणि महत्त्वाचे गुंतवणूदारही होते. या गटाकडे मिळून बायजू कंपनीचे ६० टक्के समभाग आहेत.

(हेही वाचा- Pune : पुण्यातील नवले पूल अपघाताचा बनतोय हॉटस्पॉट; 8 ते 9 वाहनांची एकमेकांना धडक )

या गुंतवणूकदारांनी कंपनीची विशेष सर्वसाधारण सभा बोलावली होती. रवींद्रन, (Rabindran) त्यांच्या पत्नी आणि भावाने आधी ठरवल्याप्रमाणे या बैठकीला दांडी मारली. रवींद्रन (Rabindran) यांनी ही बैठक बेकायदेशीर असल्याचा आरोप केला होता. आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही प्रकारची विशेष सभा होऊ शकत नाही, अशी आपली बाजू मांडली होती. तर गुंतवणूकदारांच्या मते विशेष सभेला न्यायालयाची हरकत नव्हती. (Byju Raveendran)

Insert tweet – https://twitter.com/chandrarsrikant/status/1761046961166401675

दोन गटांमध्ये वाद असल्यामुळे हे प्रकरण इतक्यात मिटणारं नाही, हे उघड आहे. रवींद्रन Rabindran या निर्णयाविरोधात कोर्टात जाऊ शकतात. पण, बहुसंख्य गुंतवणूकदार आणि संचालक मंडळातील सदस्या रवींद्रन (Rabindran) आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात आहेत, हे स्पष्ट झालं आहे. (Byju Raveendran)

रवींद्रन (Rabindran) यांच्यावर कंपनीतील महत्त्वाची माहिती गुंतवणूकदारांपासून लपवल्याचा आरोप आहे. २०२१ मध्ये कंपनीने नवीन कंपनी ताब्यात घेण्यासाठी ९५० दशलक्ष अमेरिकन डॉलरचा करार केला. यातील ७० टक्के रक्कम ही रोखीने दिली जाणार होती. पण, हा महत्त्वाचा करार रवींद्रन यांनी गुंतवणूकदारांपासून लपवून ठेवल्याचा आरोप आहे. (Byju Raveendran)

कंपनीचा ताळेबंदातही काही व्यवहार उघड न केल्याचा गुंतवणूकदारांचा आरोप आहे. थोडक्यात कंपनीचा गुंतवणूकदारांशी असलेला करार कंपनीने वेळोवेळी मोडला असल्याचा ठपका गुंतवणूकदारांनी बायजू आणि पर्यायाने रवींद्रन यांच्यावर ठेवला आहे. (Byju Raveendran)

हेही पहा-
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.