Pune : पुण्यातील नवले पूल अपघाताचा बनतोय हॉटस्पॉट; 8 ते 9 वाहनांची एकमेकांना धडक

66

पुण्यातील (Pune) नवले पुल अपघाताचे हॉटस्पॉट बनत चालले आहे. आताच हाती आलेल्या माहितीनुसार नवले पुलाजवळ पुन्हा विचित्र अपघात झाला आहे. यात आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली आहेत. या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

(हेही वाचा Veer Savarkar : वीर सावरकर यांच्या ५८व्या आत्मार्पणदिनानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन)

ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. या विचित्र अपघातात आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी, 24 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडला. कात्रजकडून (देहू रस्ता) नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवले पुलाच्या सिग्नलच्या अगोदर हा विचित्र अपघात घडला. या महामार्गावर एका ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर थांबलेल्या वाहनाला धडक दिली. त्यामुळे विचित्र अपघात घडला.

(Pune) या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. या अपघातातील जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.