महिलेने पोटात लपवल्या ड्रग्जने भरलेल्या ५४ कॅप्सूल; एनसीबीकडून अटक

88

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबई विमानतळावरून अटक केलेल्या युगांडा नागरिक असलेल्या महिलेच्या पोटातून अमली पदार्थाने भरलेल्या ५४ कॅप्सूल काढल्या आहेत. या कॅप्सूलमध्ये हेरॉईन आणि कोकेन असे कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. मुंबईतल्या जे. जे. रुग्णालयात या महिलेला दाखल करण्यात आले होते. हे कॅप्सूल काढण्यासाठी डॉक्टरांना पाच दिवसांचा कालावधी लागला. अखेर सर्व कॅप्सूल काढल्याची खात्री झाल्यानंतर या महिलेला रुग्णालयातून सोडण्यात आले.

कॅप्सूल एनसीबीच्या ताब्यात 

मुंबई विभागाच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो पथकाने २८ मे रोजी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून युगांडा येथून मुंबईत आलेल्या महिलेला संशयावरून ताब्यात घेऊन तिच्या सामानाची झडती घेण्यात आली. मात्र एनसीबीला तिच्याजवळ काहीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. दरम्यान एसीबीने या महिलेच्या शरीराची तपासणी केली असता तिच्या पोटात चिकटपट्टीला चिटकवलेल्या कॅप्सूल सदृष्य वस्तू स्कॅनींग दरम्यान आढळल्या. एनसीबीने या महिलेला तात्काळ सर, जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला दाखल करून तब्बल पाच दिवसाच्या परिश्रमाने या महिलेच्या पोटातून ५४ कॅप्सूल बाहेर काढल्या आहेत. या कॅप्सूल एनसीबीच्या ताब्यात देण्यात आल्या असून एनसीबीने या कॅप्सूल ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता ३९ कॅप्सूलमधून ४२५ ग्राम हेरॉईन आणि उर्वरित १५ कॅप्सूलमधून १७५ ग्राम कोकेन सापडले आहे.

( हेही वाचा : पुन्हा एकदा झोपड्या कोविड प्रतिबंधकतेच्या मार्गावर)

या महिलेची पूर्ण तपासणी झाल्यानंतर डॉक्टरांनी २ जून रोजी तिला रजा दिली असून एनसीबीने महिलेला पुन्हा ताब्यात घेऊन अटक केली आली आहे. या महिलेची चौकशी सुरु असून तिने हे ड्रग्ज कुठून आणले व कुठे पोहचविण्यात येणार होते याबाबत चौकशी सुरु आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.