विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपची यादी तयार? पंकजा मुंडे, चित्रा वाघांना संधी

103

राज्यसभेच्या निवडणुकीचे चित्र समोर आल्यावर आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या ७ नेत्यांची नावे समोर आली आहेत. यामध्ये पंकजा मुंडे, राम शिंदे, हर्षवर्धन पाटील, प्रसाद लाड, चित्रा वाघ आणि गोपाल अग्रवाल यांच्या नावांची चर्चा आहे. तर प्रविण दरेकर यांचे नाव निश्चित आहे. दुसरीकडे पक्षातील विधानसभेला पराभव झालेल्या नेत्यांना पुन्हा संधी देण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे.

राज्यातील विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. २० जूनला मतदान होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक ठरणार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सदाभाऊ खोत यांच्यासह १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीतून शिवसेना आणि राष्ट्रवादीचेही प्रत्येकी दोन आमदार विधान परिषदेत जातील. तर काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येईल. तर भाजपचे ४ आमदार निवडून येऊ शकतात. अशा परिस्थितीत या निवडणुकीत कोणाला संधी मिळणार आणि कोणाला डच्चू? याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच भाजपमधल्या संभावित उमेदवारांची नावे चर्चेत आली आहेत.

(हेही वाचा नामकरणातही आघाडीधर्म! कष्टक-यांच्या बीडीडी चाळींना गांधी, ठाकरे, पवार यांची नावे)

राम शिंदे, हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ यांना संधी 

दुसरीकडे राम शिंदे, हर्षवर्धन पाटील तसेच चित्रा वाघ यांचे भाजपला पुर्नवसन करायचे आहे. रोहित पवार यांच्याविरोधात लढण्यासाठी भाजपला राम शिंदे यांना रसद पुरवायची आहे. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लढण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनाही भाजपला बळ द्यायचे आहे. त्यासाठी विधानपरिषद निवडणुकीची नामी संधी आहे. त्यामुळे राम शिंदे, हर्षवर्धन पाटील यांनाही संधी मिळू शकते. चित्रा वाघ गेल्या दोन वर्षापासून महाविकास आघाडीविरोधात सातत्याने भूमिका मांडत आहेत. तीन पक्षांच्या सरकारवर टीकेची त्या एकही संधी सोडत नाही. तसेच ओबीसी नेत्याला विधान परिषदेवर संधी दिली जावी, या मतप्रवाहातून चित्रा वाघ यांनाही संधी मिळू शकते. जेणेकरुन विधान परिषदेत त्या भाजपची जोरदार आणि आक्रमकपणे बाजू मांडू शकतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.