नामकरणातही आघाडीधर्म! कष्टक-यांच्या बीडीडी चाळींना गांधी, ठाकरे, पवार यांची नावे

77

महाविकास आघाडी सरकारने आता नामकरणातही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी आघाडी धर्म पळाला आहे. मुंबईतील तीन ठिकाणच्या बीडीडी चाळींना महाविकास आघाडीतील तीन पक्षांनी नामकरण केले आहे. त्यात वरळीतील बीडीडी चाळींना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नगर, नायगांव येथील बीडीडी चाळीला शरद पवार नगर आणि ना. म. जोशी बीडीडी चाळीला राजीव गांधी नगर असे देण्यात येणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय शुक्रवार, ३ जून २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आला.

काय म्हटले शासननिर्णयात?

तत्कालीन मुंबई विकास विभागाने (बी.डी.डी.) सन १९२१-१९२५ च्या दरम्यान मुंबईतील वरळी, ना.म. जोशी मार्ग, नायगांव व शिवडी येथे एकूण २०७ चाळी बांधलेल्या आहेत. प्रत्येक चाळ ही तळ + ३ व मजल्यांची असून, त्यात प्रत्येकी ८० प्रमाणे रहिवाशी गाळे आहेत. तसेच या बी.डी.डी. चाळींच्या परिसरात झोपडपट्टीसदृश्य बांधकामे स्टॉल्स, दुकाने, सामाजिक / शैक्षणिक संस्था देखील आहेत. या बी.डी.डी. चाळी जवळपास ९६ वर्षापेक्षा जास्त जुन्या झालेल्या असल्याने, त्यांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय शासनाने मंत्रिमंडळाच्या मान्यतेने घेतलेला आहे व तसे आदेश वाचा येथील ३०.०३.२०१६ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आलेले आहेत. पुनर्विकास होत असलेल्या बी.डी.डी. चाळींचे नामकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास अनुसरुन शासनाने बी.डी.डी. चाळ, वरळीला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नगर, बी.डी.डी. चाळ, ना.म. जोशी मार्गला स्वर्गीय राजीव गांधी नगर आणि  बी.डी.डी. चाळ, नायगांवला शरद पवार नगर असे नाव देण्यात येणार आहे.

(हेही वाचा राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी होणार चुरस! मविआ आणि भाजप यांच्यात कसे आहे संख्याबळ? )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.