Ajit Pawar : इथेनॉलवरील बंदी उठविण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना भेटणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉलचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

127
NCP च्यावतीने १८ फेब्रुवारीला नवी मुंबईमध्ये अल्पसंख्याक विश्वास मेळावा
NCP च्यावतीने १८ फेब्रुवारीला नवी मुंबईमध्ये अल्पसंख्याक विश्वास मेळावा

राज्यात झालेला अवकाळी पाऊस, गारपिट तसेच दूध, कापूस, ऊस आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, कांदा निर्यातीवरील निर्बंध, उसापासूनच्या इथेनॉलवर (ethanol) बंदी तसेच मराठा आरक्षण या प्रश्नांवर लवकरच केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन मार्ग काढणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी (०८ डिसेंबर) विधानसभेत दिली. तसेच दूध दराच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. (Ajit Pawar)

विधानसभेत शुक्रवारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षाच्यावतीने स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र, या प्रस्तावाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांनी अनुमती नाकारली. मात्र, यावर म्हणणे मांडण्याची संधी नार्वेकर यांनी विरोधी पक्षाला संधी दिली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी केंद्र सरकारचे कृषीमाल विषयक निर्यात बंदीचे धोरण आणि उसापासूनच्या इथेनॉलनिर्मितीवर (ethanol) केंद्र सरकारने आणलेली बंदी यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा मुद्दा मांडला. केंद्र सरकार राज्याच्या शेतमाल निर्यातीचे मार्ग बंद करत असल्याचे सांगत कांदा निर्यातीबाबत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. यावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी वरील खुलासा केला. (Ajit Pawar)

(हेही वाचा – Online Game 52 Arrested : ऑनलाईन गेममधून युवकांची फसवणूक, ३ वर्षात ३६ गुन्हे दाखल, ५२ अटकेत)

राज्यातील शेतकऱ्यांच्या सर्वच प्रश्नावर चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. अवकाळी पाऊस, गारपिट, दूध, कापूस, संत्रा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्याशी चर्चा झाली असून सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा निर्णय घेतला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनी पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉलचा (ethanol) वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. तर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी साखरेपेक्षा इथेनॉल (ethanol) तयार करण्याचा सल्ला साखर कारखान्यांना दिला आहे. पण केंद्र सरकारने अचानक उसापासूनच्या इथेनॉल (ethanol) निर्मितीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात मी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली आहे. कारण या निर्णयामुळे अनेक साखर कारखान्यांना ऊस गाळता येणार नाही. त्यामुळे दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्र्यांना भेटून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्याबाबत आमची चर्चा झाली आहे. त्यानुसार सोमवार किंवा मंगळवारी दिल्लीत जाऊन चर्चा केली जाईल. या बैठकीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी चर्चा करून मार्ग काढण्याचा सरकार कसोशीने प्रयत्न करेल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. (Ajit Pawar)

(हेही वाचा – Deepak kesarkar : अधिवेशन सोडून पालकमंत्र्यांनी गाठली थेट मुंबई, कारण काय जाणून घ्या)

दूध उत्पादकांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली जाईल. कामाच्या व्यापात मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाला नाही तर त्यांच्या परवानगीने आपण स्वत: आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेऊ, असेही अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले. (Ajit Pawar)

तत्पूर्वी, केंद्र सरकारने उसापासूनच्या इथेनॉलनिर्मितीवर (ethanol) बंदी आणल्यामुळे राज्यातील उस उत्पादक शेतकरी संकटात सापडल्याचे जयंत पाटील यांनी सरकारच्या निदर्शनास आणले. उसाला थोडा जास्त दर मिळण्याची शेतकऱ्यांची आशा केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे संपुष्टात आली आहे. त्यामुळे यासंदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेणार आणि कांदा निर्यातीवर आणलेली बंदी उठविण्यासाठी सरकार कोणती भूमिका घेणार याविषयी खुलासा करण्याची मागणी जयंत पाटील यांनी यावेळी केली. (Ajit Pawar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.