Online Game 52 Arrested : ऑनलाईन गेममधून युवकांची फसवणूक, ३ वर्षात ३६ गुन्हे दाखल, ५२ अटकेत

घरबसल्या विनासायास पैसे कमावण्याच्या मोहापायी आतापर्यंत अनेकांनी ऑनलाईन खेळात आयुष्याची राखरांगोळी केली तर काहींनी आयुष्य संपवलं.

146
Online Game 52 Arrested : ऑनलाईन गेममधून युवकांची फसवणूक, ३ वर्षात ३६ गुन्हे दाखल, ५२ अटकेत
Online Game 52 Arrested : ऑनलाईन गेममधून युवकांची फसवणूक, ३ वर्षात ३६ गुन्हे दाखल, ५२ अटकेत

घरबसल्या विनासायास पैसे कमावण्याच्या मोहापायी आतापर्यंत अनेकांनी ऑनलाईन खेळात (Online Game) आयुष्याची राखरांगोळी केली तर काहींनी आयुष्य संपवलं. गेल्या तीन वर्षात महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणी ३६ गुन्हे दाखल केले असून ५२ जणांना अटक केली. (Online Game 52 Arrested)

आत्महत्येबाबत गुन्हे दाखल

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी (०८ डिसेंबर) विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की ऑनलाईन रमीमध्ये पैसे हरल्यामुळे व मानसिक तणावामधून चंद्रपूर जिल्ह्यात एका इसमाने पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या केली. ऑनलाईन रमीमध्य पैसे हरल्याने ठाणे शहर येथे २ आणि रायगड जिल्ह्यात एका इसमाने, नाशिक ग्रामीण भागात रौलेट नावाच्या जुगारात पैसे हरल्याने दोघांनी तसेच गोंदिया येथे ऑनलाईन गेमिंग व बेटिंगमध्ये पैसे हरल्याने एका इसमाने आत्महत्या केली. यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Online Game 52 Arrested)

(हेही वाचा – Konkan Mandal Mhada Lottery : म्हाडा कोंकण मंडळाची सोडत ढकलली पुढे)

दोन वेबसाईट बंद..

मुंबई शहराच्या सायबर विभागामार्फत पोलीस उपआयुक्त सायबर गुन्हे, यांच्याकडून गेमकींग इंडिया या कंपनीच्या www.gamekingindia.com व www.planetgoline.com या वेबसाईट बंद करण्यात आल्याची माहिती गृहमंत्र्यांनी आपल्या लेखी उत्तरात दिली. (Online Game 52 Arrested)

संपत्ती विक्रीची नोंद नाही

गृहमंत्र्यांनी ऑनलाईन गेमिंगच्या (Online Game) नादात काहींनी पैसे गमावल्याचे मान्य केले असले तरी ऑनलाईन खेळासाठी विद्यार्थी व तरुणपिढीने घरातील संपत्ती विक्री करणे व नैराश्य याबाबतच्या गुन्ह्याची नोंद आढळून येत नसल्याचे उत्तरात स्पष्ट केले. (Online Game 52 Arrested)

(हेही वाचा – DCM Ajit Pawar : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सहमतीने मार्ग काढणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत आश्वासन)

जनजागृती  केली

ऑनलाईन गेममधून (Online Game) युवकांची फसवणूक होऊ नये म्हणून विविध जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी १,९५८ शाळा, महाविद्यालयात नियमितपणे भेटी देऊन ३ लाख ५३ हजार ५९१ विद्यार्थी, पालक, शिक्षक, सर्वसामान्य लोकात जनजागृती केली, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. (Online Game 52 Arrested)

अभिनेते खेळाडूंमुळे आकर्षण

रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी या विषयाकडे लक्ष वेधताना प्रश्न उपस्थित  केला की प्रसिद्ध अभिनेते, खेळाडू, सुप्रसिद्ध व्याकरती तसेच चॅनेलच्या माध्यमातून जाहिरातीद्वारे आवाहन करून युवकांना आकथित करण्यात येत आहे हे खरे आहे का? त्यावर गृहमंत्र्यांनी ‘होय हे खरे आहे’ असे उत्तरात म्हटले. रम्मी सर्कल, जंगली रम्मी, टीम पट्टी व ए-२३ यासारख्या ऑनलाईन गेमच्या विळख्यात मोठ्या प्रमाणात तरुण पिढी अडकून आर्थिकदृष्ट्या उध्वस्त होत आहे काय? या प्रश्नावर फडणवीस यांनी उत्तर देताना ‘हे खरे नाही’ असे नमूद केले. (Online Game 52 Arrested)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.