Narayan Rane-Deepak Kesarkar : शनिवारी मुंबईत राणे-केसरकर एकत्र भेटणार

भुलेश्वर येथील सी पी टँक चौक परिसरातील माधवबाग याठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात राणे आणि केसरकर हे एकत्र भेटणार आहे.

504
Narayan Rane-Deepak Kesarkar : शनिवारी मुंबईत राणे-केसरकर एकत्र भेटणार
Narayan Rane-Deepak Kesarkar : शनिवारी मुंबईत राणे-केसरकर एकत्र भेटणार

कोकणातील एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले आणि राणे यांच्यावर कोकणातील दहशतवादाचा आरोप करणारे मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची मागणील आठवड्यात त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली. भेटीनंतर राणे आणि केसरकर यांची गट्टी जमली असल्याचे बोलले जात असतानाच शनिवारी पुन्हा एकदा मुंबईत एकत्र भेटणार आहे. भुलेश्वर येथील सी. पी. टँक चौक परिसरातील माधवबाग याठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात राणे (Narayan Rane) आणि केसरकर (Deepak Kesarkar) हे एकत्र भेटणार आहे. त्यामुळे कोकणात राणे आणि केसरकर यांना युती धर्म म्हणून एकत्र आणण्याचा प्रयत्न केंद्राच्या माध्यमातूनच होत असल्याचे स्पष्ट होत आहे. (Narayan Rane-Deepak Kesarkar)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थितांशी संवाद

केंद्र शासन पुरस्कृत तसेच महाराष्ट्र शासनाच्या योजनांची नागरिक, विद्यार्थी, महिला, कामगार व इतर गरजू घटकांना माहिती व्हावी, त्यांना या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी राज्यभरात २८ नोव्हेंबर २०२३ ते दिनांक २६ जानेवारी २०२४ पर्यंत ‘विकसित भारत संकल्प यात्रेचे’ नियोजन करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. गरजूंपर्यंत या योजना पोहोचविणे हा विकसित भारत संकल्प यात्रेचा संकल्प असल्याची माहिती शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली. तसेच शनिवार, ९ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे दृकश्राव्य माध्यमाद्वारे यात्रेसाठी उपस्थित नागरिकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे सी विभागात माधव बाग, कावासजी पटेल मार्ग, सी. पी. टँक सर्कल, भुलेश्वर, मुंबई येथे उपस्थित राहणार असल्याचेही पालकमंत्री दिपक केसरकर यांनी नमूद केले. (Narayan Rane-Deepak Kesarkar)

(हेही वाचा – RBI Decission : UPI पेमेंट मर्यादा वाढवली मर्यादा; जाणून घ्या काय आहेत नवीन नियम)

मुंबईकरांना विविध योजनांची माहिती

गरजू नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांना योजना समजावून सांगण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा हे अभियान सुरू करण्यात आले आहे. आपल्या परिसरात जेव्हा ही वाहने येतील तेव्हा मुंबईकरांनी विविध योजनांची माहिती आणि लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केले आहे. (Narayan Rane-Deepak Kesarkar)

राणे आणि केसरकर यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध

मागील आठवड्यात मालवणमधील नारायण राणे (Narayan Rane) यांच्या घरी जाऊन दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी भेट घेतल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या आणि राजकीय चर्चा रंगू लागल्या होत्या. परंतु केसरकर आणि राणे यांना आता थेट देशाचे पंतप्रधानच एकत्र आणणार असून सी. पी. टँक चौक येथील माधवबाग येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात हे दोन्ही कट्टर विरोधक असलेले नेते एकत्र येणार आहे. त्यामुळे कोकणातील दुरावा दूर करून राणे (Narayan Rane) आणि केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न भाजपकडूनच सुरु असल्याचे बोलले जात आहे. (Narayan Rane-Deepak Kesarkar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.