Aaditya L 1: आदित्य १ बाबत मोठी अपडेट ,पहिल्यांदाच समोर आली सूर्याची छायाचित्र

213
Aaditya L 1: आदित्य १ बाबत मोठी अपडेट ,पहिल्यांदाच समोर आली सूर्याची छायाचित्र
Aaditya L 1: आदित्य १ बाबत मोठी अपडेट ,पहिल्यांदाच समोर आली सूर्याची छायाचित्र

भारताची पहिली सौर मोहीम असणाऱ्या ‘आदित्य एल-1’ बाबत इस्रो (ISRO) ने आदित्य L 1 मोहिमेबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. या अंतराळ यानान सूर्याची अत्यंत जवळून पहिल्यांदाच छायाचित्र टिपली आहेत. हे मोहिमेतिल सर्वात मोठे यश आहे. सोलार अल्ट्रा व्हॉयोलेट इमेजिंग टेलिस्कोप द्वारे Suit ही मनमोहक छायाचित्रे घेण्यात यश आले आहे. यात सौर निरीक्षण आणि संशोधनातील एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. (Aaditya L 1)

(हेही वाचा : Narayan Rane-Deepak Kesarkar : शनिवारी मुंबईत राणे-केसरकर एकत्र भेटणार)

SUIT पेलोड जवळच्या अल्ट्राव्हायोलेट तरंगलांबीमध्ये सूर्याच्या पूर्ण-डिस्क प्रतिमा कॅप्चर करते. suit ला प्रतिमा घेण्यासाठी २० नोव्हेंबर रोजी कमांड देण्यात आली होती .या प्रतिमांमध्ये 200 ते 400 nm या तरंगलांबीमध्ये सूर्याचे प्रथमच पूर्ण-डिस्क प्रतिनिधित्व समाविष्ट आहे.यामध्ये सूर्याचा दृश्यमान पृष्ठभाग आणि त्याच्या अगदी वरचा पारदर्शक थर दिसतो आहे. तसेच सूर्यावरील ठिपके फ्लेअर्स आणि प्रॉमिनन्स यांसह विविध सौर घटना समजून घेण्यासाठी हे स्तर महत्त्वपूर्ण आहेत. (Aaditya L 1)

हेही पहा-

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.