Weather Update : राज्यात थंडीचा पारा घसरला; रब्बी पिकांना पोषक वातावरण

देशात कुठे पाऊस तर कुठे थंडीची लाट पाहायला मिळत आहे. तामिळनाडूच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर परिरस्थितीमुळे रेल्वे सेवेसह राज्यातील दळणवळण सेवाही विस्कळीत झाली आहे.

138
Weather Update : राज्यात थंडीचा पारा घसरला; रब्बी पिकांना पोषक वातावरण

राज्यात पुढील दोन ते तीन दिवस थंडी वाढणार असून हवामान (Weather Update) कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई, पुणे, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरण्याचा अंदाज आहे. नाताळच्या दरम्यान महाराष्ट्रातील तापमान वाढण्याचा अंदाज आहे.

दरम्यान मागच्या काही दिवसांपासून दक्षिण भारतात पाऊस सुरू आहे. तर पर्वतीय भागात बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीचा (Weather Update) कडाका वाढला आहे. याचा महाराष्ट्रातील वातावरणावर देखील परिणाम होतांना दिसत आहे.

(हेही वाचा –  Sakshi Malik : … म्हणून साक्षी मलिकने घेतला निवृत्तीचा निर्णय)

परभणी जिल्ह्याचे तापमान १०.०८ अंशापर्यंत घसरले असल्याने सर्वत्र जिल्ह्यात कडाक्याची थंडी (Weather Update) पसरली आहे. शहरातही शेकोट्या पेटल्या आहेत. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने शेतीपिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. याचा फायदा कांदा, गहू, हरभरा या पिकांना होताना दिसून येत आहे.

(हेही वाचा – Ind vs SA 3rd ODI : संजू सॅमसनने शतकानंतर दंड का पिळवटले? )

नाताळनंतर थंडी वाढणार 

उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे (Weather Update) राज्यात थंडीचा जोर वाढणार आहे. दोन दिवसांनंतर मात्र राज्यातील तापमानात वाढ होणार आहे. नाताळच्या दरम्यान राज्यात २८ डिसेंबर पर्यंत गारठा वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra weather update)

(हेही वाचा – WFI Election : ब्रिजभूषण शरण यांचे निकटवर्तीय संजय सिंग यांची अध्यक्षपदी निवड )

देशात कुठे पाऊस तर कुठे थंडीची लाट

देशात कुठे पाऊस तर कुठे थंडीची लाट पाहायला मिळत आहे. तामिळनाडूच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर परिरस्थितीमुळे रेल्वे सेवेसह राज्यातील दळणवळण सेवाही विस्कळीत झाली आहे. (Weather Update)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.