Coronavirus JN1 variant : एका दिवसात सहा जणांचा मृत्यू ; कोरोनाची धास्ती वाढली

देशभरात ५९४ नवे रुग्णही आढळून आले आहेत. मे महिन्यानंतरचा अर्थात गेल्या सात महिन्यांतील हा मोठा आकडा आहे.

229
Corona JN-1 Virus : कोरोनाच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, माहितीसाठी 'या' हेल्पलाइनवर संपर्क करा
Corona JN-1 Virus : कोरोनाच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, माहितीसाठी 'या' हेल्पलाइनवर संपर्क करा

देशात गुरुवारी (२१ डिसेंबर) कोरोनामुळे सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यापैकी तीन जण केरळमधील, दोन जण कर्नाटकातील, तर एक जण पंजाब मधील आहे.याशिवाय देशभरात ५९४ नवे रुग्णही आढळून आले आहेत. मे महिन्यानंतरचा अर्थात गेल्या सात महिन्यांतील हा मोठा आकडा आहे. (Coronavirus JN1 variant )

देशात पुन्हा एकदा कोरोना पसरतोय की काय अशी भीती वाटू लागली आहे. JN.1यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. तर यासंदर्भात बोलताना तज्ञांनी सांगितले की, याला कोरोनाची नवी लाट म्हणण्यासाठी काही दिवस वाट बघावी लागेल. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मात्र याच वेळी JN.1हा कदाचित WHO चा शेवटचा व्हेरीयंट ऑफ इंटरेस्ट नसेल यामुळे सावध राहणे आवश्यक आहे असा इशाराही त्यांनी दिला आहे. (Coronavirus JN1 variant )

(हेही वाचा : Coronavirus JN1 variant : मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा)

आरोग्य मंत्रालयाच्या एका आधिकाऱ्याने दिलेल्या माहिती नुसार कोविड-१९ हा गंभीर लक्षणे अथवा मृत्यूचे कारण होऊ शकत नाही. पॉझिटिव्ह आढळणाऱ्या लोकांमध्ये केवळ हलक्या स्वरूपाची लक्षणे आढळत आहेत. मात्र अजूनपर्यंत विमानतळावर RT-PCR टेस्ट बंधनकारक असल्याच्या अशा कोणत्याही सूचना सरकारकडून देण्यात आलेल्या नाहीत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.