-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
चांदिवली – संघर्ष नगर मधील रहिवाशांसाठी मुंबई महानगरपालिकेने विजय अग्निशमन मार्गावरील महानगरपालिका उद्यान येथे नवीन उदंचन टाकीचे बांधकाम पूर्ण केले आहे. या उदंचन टाकीतून मंगळवारी १९ ऑगस्ट २०२५ पासून संघर्ष नगर येथील इमारत क्रमांक ९, १०, ११, १२, १३ आणि १३ अ यांना पाणीपुरवठा (Water Supply) केला जाणार आहे. दररोज दुपारी १२.०० ते सायंकाळी ४.०० ही पाणीपुरवठ्याची नियमित वेळ आहे.
(हेही वाचा – Madhya Pradesh High Court : सोशल मीडियावर महिलांना धमकाविण्याचं प्रकरण; उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी)
नवीन उदंचन टाकीतून पाणीपुरवठा (Water Supply) केला जाणार असून नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ४ ते ५ पाणी उकळून – गाळून प्यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

