- कल्याण : प्रतिनिधी
Water Cut : दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच कल्याण-डोंबिवलीत (Kalyan-Dombivli) आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा (Water supply) बंद ठेवण्यात येत होता. यंदा अल निनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे उन्हाळा रणरणता गेला तर पावसाळ्याची सुरूवात लांबणीवर पडली आहे. त्यातच बारवी धरणातील (Barvi Dam) पाणी साठा अवघा २७ टक्केच शिल्लक आहे. परिणामी जल संपदा विभागाच्या निर्देशांनुसार २० टक्के पाणी कपात (Water Cut) लागू करण्यात आली आहे. आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने आधीच पाणी टंचाई असलेल्या कल्याण-डोंबिवलीकरांवर जल संकट ओढवले आहे.
(हेही वाचा – मुंबई ते पुणे अवघ्या ४८ मिनिटांत! रेल्वे मंत्री Ashwini Vaishnaw यांनी देशातील ७ नव्या प्रकल्पांना दिली मंजुरी )
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) मोहने आणि मोहिली येथील स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून कल्याण-डोंबिवली शहराला पाणी पुरवठा करते. तर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांना एमआयडीसीमार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र शहराची वाढती लोकसंख्या आणि वितरण व्यवस्थेतील दोष यामुळे अनेक ठिकाणी पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे नागरिकांना नाहक भुर्दंड पडत आहे.
चांगला पाऊस पडेपर्यंत केडीएमसीकडून दरदिवशी २० टक्के पाणी कपात (Water Cut) करून पाणी पुरवठ्याचे ३१ ऑगस्ट पर्यंत नियोजन करण्यात आले आहे. परंतु टंचाई ग्रस्त भागात जल संकट अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत. नेतिवली जल शुद्धीकरण केंद्रातून होणारा डोंबिवली पूर्वेला एफ आणि जी वॉर्डमधील पाणी पुरवठा येत्या १७ जून रोजी २४ तास बंद राहणार आहे. याच पद्धतीने बारावे जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा डी व जे वॉर्डमधील पाणी पुरवठा १८ जून रोजी बंद राहणार आहे. नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा डोंबिवली पश्चिमेतील एच वॉर्डमधील पाणी पुरवठा १९ जून रोजी बंद राहणार आहे. बारावे जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा कल्याण पश्चिमेतील बी आणि सी वॉर्डमधील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. मोहिली जल शुद्धीकरण केंद्रातून होणारा मांडा-टिटवाळा, शहाड ए वॉर्ड, तसेच बी वॉर्डमधील योगीधाम ते वालधुनी परिसराला होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

