मुंबई ते पुणे अवघ्या ४८ मिनिटांत! रेल्वे मंत्री Ashwini Vaishnaw यांनी देशातील ७ नव्या प्रकल्पांना दिली मंजुरी  

225
Railway Minister Ashwini Vaishnaw discussing new projects
Ashwini Vaishnaw announces new high-speed rail projects.
भारतातील दळणवळण क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. देशातील प्रमुख शहरांना एकमेकांशी जोडण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministry ) सात नवीन हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोअर (High Speed Rail Corridors) विकसित करण्याची जंगी योजना आखली आहे. या भव्य प्रकल्पासाठी सुमारे सोळा लाख कोटी रुपयांचा अफाट खर्च अपेक्षित आहे. या योजनेमुळे केवळ विमान प्रवासाला एक सक्षम आणि किफायतशीर पर्याय मिळणार नाही, तर प्रवाशांचा मौल्यवान वेळही वाचणार आहे. (Ashwini Vaishnaw)

(हेही वाचा – Manav Suthar ची काउंटी क्रिकेटमध्येही पदार्पणाच्या सामन्यात चमकदार कामगिरी)

वेगवान कनेक्टिव्हिटी मिळणार
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी कोलकातामध्ये या प्रकल्पांचा आढावा घेतला. तेव्हा त्यांनी दिल्ली-वाराणसी आणि वाराणसी-सिलिगुरी या मार्गाची पाहणी केली. दिल्ली ते सिलिगुरी दरम्यानचा प्रवासाचा वेळ फक्त सहा तासांवर येणार आहे. यावेळी त्यांनी असंही नमूद केलं की मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai-Ahmedabad bullet train) कॉरिडोरसह हे नवीन रेल्वे प्रकल्प दक्षिण, उत्तर आणि पूर्व भारतामध्ये हाय-स्पीड रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या हाय-स्पीड रेल्वेंमुळे अहमदाबाद, मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरू आणि चेन्नई या शहरांमध्ये वेगवान कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. (Ashwini Vaishnav)
कसे असतील मार्ग?
पहिली हाय-स्पीड रेल्वे (First high speed Train) दिल्ली ते वाराणसीपर्यंत धावणार असून हा मार्ग 945 किलोमीटर लांब असेल. प्रवास केवळ 3.5 तासांमध्ये होणार आहे. दुसरी ट्रेन वाराणसी ते सिलिगुरी असून या 670 किमी लांब ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ 2.4 तासांवर येणार आहे. त्यानंतर मुंबई ते पुणे हाय-स्पीड रेल्वे मार्ग 170 किमी लांब असेल व प्रवास अवघ्या 48 मिनिटांमध्ये होणार आहे. सध्या मुंबई ते पुणेदरम्यान सर्वात वेगवान रेल्वे म्हणजे डक्कन क्वीन. या ट्रेननेही प्रवासात 3.3 तास जातात. चौथा 501 किमी लांब मार्ग पुणे ते हैदराबाद असेल व प्रवास अवघ्या 1.6 तासांत शक्य होणार आहे. त्यानंतर हैदराबाद-बंगळुरू, बंगळुरू-चेन्नई आणि चेन्नई-हैदराबाद मार्गामुळेही प्रवास वेगवान होणार आहे.
पहिली बुलेट ट्रेन कधी?
सध्या भारतात पहिली पूर्णपणे स्वदेशी बनावटीची बुलेट ट्रेन तयार केली जात आहे. ताशी 280 किमी वेगाने ही ट्रेन धावणार असून बुलेट ट्रेनच्या पहिल्या टप्प्यात 100 किलोमीटर मार्गावर धावणार आहे. ऑगस्ट 2027मध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवरील सुरत ते बिलिमोरा या मार्गाचं उद्घाटन करून ट्रेनसेवा सुरू केलं आहे. या ट्रेनचा वेग नंतर ताशी 350 किमीही करण्याची योजना आहे.
(हेही वाचा – Ebola Outbreak : आफ्रिकेत इबोलाचे 100 हून अधिक बळी; WHO चा कडक इशारा, भारतात काय स्थिती? )
सध्या मुंबई आणि अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या (Bullet Train) बांधकामाचा वेग 15 किलोमीटर दरमहा पर्यंत पोहोचला आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे हे शक्य झालं आहे. दरम्यान, TOIला मिळालेल्या महितीनुसार प्रकल्पाचं बांधकाम सुरू झाल्यावर दरवर्षी 250 किलोमीटर लांब बुलेट ट्रेन मार्ग बांधण्याचं रेल्वे मंत्रालयचं उद्दिष्ट आहे. सध्या मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन कॉरिडोरची अंतिम डेडलाइन जाहीर केली नसली तरी 2029पर्यंत मार्ग कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.

 

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.