Veer Savarkar Jayanti 2026 : मंत्रालयात मंत्री मंगलप्रभात लोढांकडून ‘क्रांतिसूर्या’ला भावपूर्ण अभिवादन

102
Minister Mangal Prabhat Lodha pays tribute to Savarkar.
Veer Savarkar Jayanti 2026 : मंत्रालयात मंत्री मंगलप्रभात लोढांकडून 'क्रांतिसूर्या'ला भावपूर्ण अभिवादन
  • प्रतिनिधी

Veer Savarkar Jayanti 2026                स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी मंत्रालयात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. (Veer Savarkar Jayanti 2026)

(हेही वाचा – Meta Subscription : मेटाचे मोठे पाऊल; इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपसाठी ‘प्लस’ सबस्क्रिप्शन सेवा सुरू)

देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी दिलेल्या बलिदानाचे आणि त्यांच्या अद्वितीय विचारांचे यावेळी स्मरण करण्यात आले. या कृतज्ञता सोहळ्यात सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी निलेश हरड यांच्यासह विभागातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावरकरांच्या त्यागाची गौरवगाथा आणि त्यांचे राष्ट्रभक्तीचे विचार उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण करणारे ठरले. याप्रसंगी सर्वांनी सावरकरांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.