Vande Bharat in Kashmir : वंदे भारत ट्रेन आता काश्मीरपर्यंत धावणार

वंदे भारत ट्रेनविषयी महत्त्वाचा अपडेट देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही ट्रेन लवकरच श्रीनगरपर्यंत धावणार असल्याची घोषणा केली आहे.

135
Vande Bharat in Kashmir : वंदे भारत ट्रेन आता काश्मीरपर्यंत धावणार
Vande Bharat in Kashmir : वंदे भारत ट्रेन आता काश्मीरपर्यंत धावणार
  • ऋजुता लुकतुके

वंदे भारत ही मेड इन इंडिया ट्रेन आता काश्मीरपर्यंत धावणार आहे. याचवर्षी ही ट्रेन सुरू करण्याचा भारतीय रेल्वेचा मानस आहे. वंदे भारत ट्रेनविषयी महत्त्वाचा अपडेट देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही ट्रेन लवकरच श्रीनगरपर्यंत धावणार असल्याची घोषणा केली आहे. जम्मू ते श्रीनगर रेल्वे मार्गाची उभारणी शेवटच्या टप्प्यात आहे आणि हा मार्ग तयार झाला की, लगेचच वंदे भारत ट्रेन इथं सुरू करता येईल, असं वैष्णव पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. (Vande Bharat in Kashmir)

‘वंदे भारत ट्रेन सर्व प्रकारच्या वातावरणात आणि हवामान तसंच तापमानात चालतील अशा रेल्वे गाड्या आहेत. त्यामुळे काश्मीरमध्येही लवकरच ही ट्रेन धावताना दिसेल. याच आर्थिक वर्षात ही ट्रेन सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असेल,’ असं अश्विनी वैष्णव म्हणाले. (Vande Bharat in Kashmir)

(हेही वाचा – Visa Service : कॅनडाची मुंबईसह बंगळूर आणि चंदीगड येथील व्हिसा सेवा स्थगित)

चालू आर्थिक वर्षांत जम्मू ते श्रीनगर इथल्या रेल्वे मार्गाचं उद्घाटन अपेक्षित आहे. त्यानंतर ही रेल्वे सुरू करता येईल. फक्त काश्मीरच नाही तर त्रिपुरा राज्यातही वंदे भारत सुरू करण्याचे रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत. देशाच्या ईशान्य टोकाला असलेल्या या राज्यात रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण सुरू आहे. ते काम पूर्ण झाल्यावर इथं सेमी-हाय स्पीड असलेली वंदे भारत रेल्वे सुरू करता येईल. (Vande Bharat in Kashmir)

पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत ७५ नवीन वंदे भारत ट्रेन सुरू करणार असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं आहे. तर अलीकडेच बडगाम ते बनिहाल या रेल्वेमध्ये रेल्वेनं विस्टाडोम डबा बसवला आहे. तीन बाजू काचेच्या असलेल्या या डब्यातून काश्मीरचं सुरेख निसर्गसौदर्य टिपता येतं. (Vande Bharat in Kashmir)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.