Construction Site Work : बांधकामाच्या ठिकाणी उपाययोजनात कमतरता, महापालिका देणार स्टॉप वर्क नोटीस

महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभाग (वॉर्ड) अंतर्गत येणाऱ्या बांधकाम ठिकाणांची पाहणी करण्यासाठी विशेष पथकं गठीत करण्यात येणार असून प्रत्येक विभागात किमान ५० पथकांची नियुक्ती केली जाणार आहे.

164
Construction Site Work : बांधकामाच्या ठिकाणी उपाययोजनात कमतरता, महापालिका देणार स्टॉप वर्क नोटीस
Construction Site Work : बांधकामाच्या ठिकाणी उपाययोजनात कमतरता, महापालिका देणार स्टॉप वर्क नोटीस

महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभाग (वॉर्ड) अंतर्गत येणाऱ्या बांधकाम ठिकाणांची पाहणी करण्यासाठी विशेष पथकं गठीत करण्यात येणार असून प्रत्येक विभागात किमान ५० पथकांची नियुक्ती केली जाणार आहे. या पथकांनी बांधकामांच्या ठिकाणी अचानक भेटी देऊन थेट व्हिडिओ चित्रिकरण करावे. तसेच उपाययोजनांमध्ये काहीही कमतरता आढळून आल्यास थेट जागेवरच स्टॉप वर्क नोटिस देऊन अशी बांधकामे लगेच रोखावीत, असे निर्देश महापालिका आयुक्त व प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दिले. (Construction Site Work)

हवेतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याबाबत महानगरपालिकेतील सर्व संबंधित खात्यांसह एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, एमएमआरसीएल, एमआयडीसी आदी यंत्रणा तसेच क्रेडाई, एमसीएचआय, नारेडको, पीइएटीए या विकासकांच्या विविध संघटनांची संयुक्त बैठक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी २० ऑक्टोबर २०२३ रोजी संपन्न झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना महानगरपालिका आयुक्त चहल हे बोलत होते. या बैठकीत आयुक्त चहल यांनी धूळ व प्रदूषण नियंत्रासाठीचे विविध निर्देश देतानाच सक्त सूचनाही केल्या. (Construction Site Work)

मुंबईतील वीज, ऊर्जा, गॅसविषयक मोठ्या प्रकल्पांतून होणाऱ्या वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्याकडून कसोशीने प्रयत्न व्हावेत. शासनाने ठरवून दिलेल्या सर्व उपाययोजना त्यांनी केल्या आहेत किंवा कसे, याची फेरतपासणी करावी. या प्रकल्पांच्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रणासाठी असलेल्या यंत्रणांची भरारी पथकाच्या माध्यमातून तपासणी करण्यात करावी. महानगरपालिकेच्या यंत्रणेने देखील फेरतपासणी करुन रिफायनरींच्या परिसरातील हवेच्या गुणवत्तेची खात्री करावी. माहूल सारख्या परिसरांमध्ये यापुढे नियमितपणे व सक्तीने उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व संबंधित यंत्रणांची असेल. अन्यथा, त्यांनाही कारवाईला सामोरे जावे लागेल. (Construction Site Work)

(हेही वाचा – Scheduled Tribes : अनुसूचित जमातीच्या समावेशासाठी समिती करणार स्थापन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय)

सर्व सहायक आयुक्तांनी आपल्या अखत्यारित पदपथ व इतर ठिकाणी सुरु असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी देखील धूळ प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात. विहित कालमर्यादेपेक्षा अधिक जुन्या अशा डिझेल आधारित वाहनांना प्रवेशास बंदी आहे, त्याअनुषंगाने याची पाहणी राज्य परिवहन विभागाच्या माध्यमातून कटाक्षाने करण्यात यावी. मुंबईतील प्रत्येक रस्त्यांची स्वच्छता करताना धूळ कमी करण्यासाठी महानगरपालिकेच्या रस्ते विभागाचे पथक पाहणी करतील. तसेच, मुंबई महानगरातील अतिशय वर्दळीच्या किमान ५० ते ६० रस्त्यांवर वाहन आधारित धूळ प्रतिबंधक यंत्र (ऍण्टी स्मॉग मशीन) नियमितपणे पाठवून दररोज भल्या पहाटे/सकाळी फवारणी करावी, जेणेकरुन रस्त्यांची स्वच्छता होऊन धूळ रोखता येईल. (Construction Site Work)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.