Israel-Hamas Conflict : युद्धामुळे उद्योग क्षेत्राला फटका, ‘या’ प्रसिद्ध कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर

सुरक्षेच्या कारणास्तव या कंपन्यांनी आता इस्त्रायलमधील आपला कारभार आटोपता घेतला आहे.

96
Israel-Hamas Conflict : युद्धामुळे उद्योग क्षेत्राला फटका, 'या' प्रसिद्ध कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर
Israel-Hamas Conflict : युद्धामुळे उद्योग क्षेत्राला फटका, 'या' प्रसिद्ध कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर

हमासने इस्त्रायलवर (Israel-Hamas Conflict) दहशतवादी हल्ला केल्यानंतर इस्त्रायलने प्रत्युत्तरादाखल युद्धाची घोषणा केली. युद्ध सुरू होऊन २ आठवड्यांचा कालावधी उलटला असला, तरीही या युद्धाचे पडसाद तसूभरही कमी झालेले नाहीत. या युद्धाचे परिणाम आता आर्थिक क्षेत्रातील घटकांवरही (Industry hit) जाणवू लागले आहेत. जगभरातील अनेक प्रसिद्ध कंपन्यानी आता इस्त्रायलबाहेर जाण्यास सुरुवात केली आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव या कंपन्यांनी आता इस्त्रायलमधील आपला कारभार आटोपता घेतला आहे. यामध्ये ‘नेस्ले’ (Nestle) या एका मोठ्या कंपनींचं नावही आहे. इस्त्रायलमधील युद्धप्रवण स्थिती पाहता नेस्लेने आपली कंपनी अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आपलं उत्पादन आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा – Mahua Moitra Case : महुआ मोईत्रा यांच्या वकिलांची माघार; न्यायाधीशांनी व्यक्त केले आश्चर्य )

हिंदुस्थानातील अनेक कंपन्यांनी इस्त्रायलमध्ये गुंतवणूक केली आहे. डॉ. रेड्डी, सन फार्मास्युटिकल्स (Sun Pharmaceuticals) , डॉ. रेड्डी, ल्युपिन, टेक महिंद्रा, टाटा कंपनी (Tata Company) आणि टाटा कन्सल्टन्सी (Tata Consultancy) सर्व्हिसेस, इन्फोसिस (Infosys), विप्रो असा कंपन्यांचाही त्यामध्ये समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.