Kokan Railway : कोकण रेल्वेवर तीन दिवस ‘मेगाब्लॉक’, या पाच रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल

126
Kokan Railway : कोकण रेल्वेवर तीन दिवस ‘मेगाब्लॉक’, या पाच रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल
Kokan Railway : कोकण रेल्वेवर तीन दिवस ‘मेगाब्लॉक’, या पाच रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल

पुढील आठवड्यात कोकण रेल्वेवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात कोकण रेल्वेवरील पाच गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार असल्याने प्रवासासाठी अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. (Kokan Railway)

असे आहेत बदल
मंगळवारी सकाळी ७.४० ते १०.४० या कालावधीत कडवई (संगमेश्वर) – रत्नागिरीदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ९ ऑक्टोबर रोजी तिरुनवेल – जामनगर गाडी ठोकूर (कर्नाटक) – रत्नागिरीदरम्यान तीन तास थांबवण्यात येणार आहे. तसेच तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक नेत्रावती एक्स्प्रेस ठोकूर – रत्नागिरीदरम्यान दीड तास थांबवण्यात येईल. मुंबई- मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस खेड – चिपळूणदरम्यान थांबवण्यात येणार आहे. गुरुवारी १२ ऑक्टोबर रोजी मडगाव – कुमटादरम्यान सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळुरू सेंट्रल – मडगाव रेल्वेगाडी मंगळुरू – कुमटा दरम्यान धावेल. तर कुमटा – मडगावदरम्यान ही गाडी रद्द करण्यात येणार आहे. मडगाव – मंगळूर विशेष गाडी कुमटा – मंगळूरु म्हणून धावेल.

(हेही वाचा : Mumbai Post Office : मुंबईतील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी टपाल विभाग करणार ई-वाहनांचा वापर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.