Sharad Pawar vs Ajit Pawar : शरद पवार यांची नियुक्ती घटनेच्या विरोधात

अजित पवार गटाचा आयोगापुढे युक्तीवाद

161
Sharad Pawar vs Ajit Pawar : शरद पवार यांची नियुक्ती घटनेच्या विरोधात
Sharad Pawar vs Ajit Pawar : शरद पवार यांची नियुक्ती घटनेच्या विरोधात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरील माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वर्चस्वाचा लढा केंद्रीय निवडणूक आयोगात पोहचला आहे. अजित पवार गटाने सोमवारी (०९ ऑक्टोबर) दुसऱ्यांदा आयोगापुढे आपली बाजू मांडली आहे. (Sharad Pawar vs Ajit Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संघर्षावर केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी सुरू आहे. काका-पुतण्याच्या गटाकडून आयोगापुढे जोरदार युक्तीवाद सुरू आहे. (Sharad Pawar vs Ajit Pawar)

महत्वाचे सांगायचे म्हणजे, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी झालेली नियुक्ती हीच मुळात बेकायदेशीर आहे, असा जोरदार युक्तीवाद अजित पवार गटाचे अधिवक्ता कौल यांच्याकडून निवडणूक आयोगासमोर करण्यात आला. अजित पवार गटाकडून युक्तीवाद करण्याचा आजचा दुसरा दिवस होता. यापूर्वी शुक्रवारी सुध्दा या गटाने आपली बाजू मांडली होती. (Sharad Pawar vs Ajit Pawar)

(हेही वाचा – Devendra Fadnavis : टोलमुक्तीच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांचे कार्यालय म्हणते…)

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची अध्यक्षपदी नियुक्ती करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले होते. अर्थात, राष्ट्रवादी काँग्रेसची जी घटना आहे त्यातील तरतुदीचे पालन न करता शरद पवार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती, असे अजित पवार गटाने आयोगाला सांगितले आहे. (Sharad Pawar vs Ajit Pawar)

अजित पवार गटाकडून तीन वकील आपली बाजू मांडणार आहेत. यात एन. के. कौल, मनिंदर सिंग आणि सिध्दार्थ भटनागर यांचा समावेश आहे. या तिन्ही वाकिलांचा युक्तीवाद झाल्यानंतर आयोगाकडून पुन्हा एकदा शरद पवार गटाचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. अजित पवार गटाने केलेल्या युक्तीवादावर आपले काय म्हणणे आहे? या मुद्यावर शरद पवार गटाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. यानंतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर निवडणूक आयोगाकडून आपला निर्णय देईल, असे सूत्राकडून सांगण्यात आले. (Sharad Pawar vs Ajit Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.