Mumbai Post Office : मुंबईतील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी टपाल विभाग करणार ई-वाहनांचा वापर

वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न आवश्यक असून यासाठी ई-वाहनांचा विचार होत आहे.

114
Mumbai Post Office : मुंबईतील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी टपाल विभाग करणार ई-वाहनांचा वापर
Mumbai Post Office : मुंबईतील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी टपाल विभाग करणार ई-वाहनांचा वापर

केंद्र सरकारच्या ई-वाहनांच्या धोरणानुसार टपाल विभागातर्फे गेल्या वर्षी पुणे विभागामध्ये ई-वाहनांचा वापर सुरू झाला. यामध्ये दुचाकी वापरण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता मुंबई विभागातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. मुंबईमध्ये काही वेळा दिल्लीपेक्षाही हवेचा दर्जा वाईट असल्याची स्थिती निर्माण होते. मुंबईतील बांधकामे आणि वाहने यासाठी सर्वाधिक प्रमाणात कारणीभूत असल्याचे अनेक अभ्यासांमधून समोर आले आहे. त्यामुळे वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न आवश्यक असून यासाठी ई-वाहनांचा विचार होत आहे. (Mumbai Post Office )

जागतिक तापमान बदलामुळे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी देश पातळीवर प्रयत्न होत आहेत. टपाल विभागानेही यामध्ये पुढाकार घेतला आहे. टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये मुंबई विभागात सर्वाधिक वाहने आहेत. ही वाहने ई-वाहनांमध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया लवकरच होण्याची शक्यता आहे.

अशी माहिती पोस्टाच्या वतीने देण्यात आली आहे. मुंबईमध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक टपाल विभागाची वाहने धावतात. मुंबईत एकूण २४० चारचाकी गाड्या आहेत. ई-वाहनांसाठी चार्जिंग सोयीपासून इतर बाबींचा विचार करून त्यानुसार योजना आखली जात आहे, असे टपाल विभागातर्फे सांगण्यात आले. तसेच पुण्याप्रमाणे मुंबईतही दुचाकी वाहनांमध्ये ई-वाहनांच्या समावेशाचा विचार सुरू आहे. ही वाहने भाडेतत्त्वावर वापरण्यासाठी घेतली जाऊ शकतात, असेही टपाल विभागातर्फे सांगण्यात आले.

(हेही वाचा : MNS Toll Agitation : राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर मनसे कार्यकर्ते उतरले टोलनाक्यावर)

सध्या या संदर्भात विविध पातळ्यांवर चर्चा सुरू असून त्याविषयी लवकरच माहिती दिली जाईल. महाराष्ट्र सर्कलमध्ये देशातील सर्वाधिक आर्थिक उलाढाल होते. यामध्ये पत्रांसोबतच पार्सल वितरणाचाही समावेश आहे. येत्या काळात ई-कॉमर्स व्यवहारांमध्येही महाराष्ट्र अधिक सक्रिय होणार आहे. अॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांसोबतच अलीकडेच दिल्लीमध्ये एका आयटी कंपनीशी केलेल्या व्यवहाराच्या माध्यमातून तीन हजार व्यापाऱ्यांचे जाळे टपाल विभागाशी जोडले गेले आहे. वाढत्या ई-कॉमर्स व्यवहारांसोबत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाणही वाढते. या पार्श्वभूमीवर टपाल विभागाने ई-वाहनांच्या वापरातून हे उत्सर्जन कमी करण्याचे ठरवले आहे. (Mumbai Post Office )

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.