DCM Devendra Fadnavis : मराठवाडा म्हणजे दुष्काळ ही ओळख पुसायची आहे

फणवीस म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटर ग्रीड, कृष्णा-मराठवाडा प्रकल्प, नांदूर मधमेश्वर अशा अनेक योजना आणल्या. मात्र २०१९ नंतर महाविकास आघाडी सरकारने या योजनांना स्थगिती दिली व मराठवाड्याचा सिंचनाचा व पाण्याचा प्रश्न अनुत्तरीत राहीला. आता पुन्हा आपले सरकार आले आहे, मागील दीड वर्षापासून मराठवाड्यातील अनेक प्रकल्पांना या सरकारने मंजूरी दिली आहे.

155
DCM Devendra Fadnavis : मराठवाडा म्हणजे दुष्काळ ही ओळख पुसायची आहे
DCM Devendra Fadnavis : मराठवाडा म्हणजे दुष्काळ ही ओळख पुसायची आहे

मराठवाडा म्हणजे दुष्काळ ही ओळख पुसली गेली पाहिजे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी केले. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर येथील उपसा सिंचन योजनेचे गुरुवारी (११ जानेवारी) फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संदीपान भुमरे व गंगापूरचे आ. प्रशांत बंब उपस्थित होते. (DCM Devendra Fadnavis)

यावेळी फडणवीस (DCM Devendra Fadnavis) म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटर ग्रीड, कृष्णा-मराठवाडा प्रकल्प, नांदूर मधमेश्वर अशा अनेक योजना आणल्या. मात्र २०१९ नंतर महाविकास आघाडी सरकारने या योजनांना स्थगिती दिली व मराठवाड्याचा सिंचनाचा व पाण्याचा प्रश्न अनुत्तरीत राहीला. आता पुन्हा आपले सरकार आले आहे, मागील दीड वर्षापासून मराठवाड्यातील अनेक प्रकल्पांना या सरकारने मंजूरी दिली आहे. मराठवाडा मंत्रीमंडळ बैठकीत मराठवाड्यातील सिंचनाच्या १८ हजार ५०० कोटींच्या कामांना मंजूरी दिली. यात, जलयुक्त शिवार २.०, कृष्णा-मराठवाडा पाणी योजना अशा योजनांचा समावेश आहे. सांगली कोल्हापूरमध्ये पुराचे वाहून जाणारे पाणी मराठवाड्याला आणण्यासाठी केंद्राने आणि जागतिक बँकेने मान्यता दिली आहे. गेल्या ३० जून २०२३ रोजी मी येथे गंगापूर सिंचन योजना मंजूर केली असे जाहीर केले होते. आता गंगापूर उपसा सिंचन भूमिपूजन होत असुन याच्या उद्घाटनाला मीच येईल, आलो. आम्ही शब्द पाळणारे आहोत पळणारे नाहीत अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर केली. (DCM Devendra Fadnavis)

(हेही वाचा – Shiv Sena : शिवसेनेतील प्रवेशाचा बांध आता फुटणार)

२५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेती मोहिमेत आणत आहोत – फडणवीस

राज्याला नैसर्गिक शेतीकडे वळवायचे आहे. कृत्रिम साधनांमुळे जमीन खराब होत आहे. २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेती मोहिमेत आणत आहोत. शेतीला सौर ऊर्जेवर वीज देण्याचा प्रयत्न आहे, त्यामुळे विजेची समस्या दूर होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. तर राज्यात अनेक योजना आणण्यात आल्या, त्यात महिलांसाठी अर्धे तिकीट केले, तर आता लेक लाडकी योजनेत (Lek Ladki Yajana) मुलगी जन्माला आली तर कुटुंबियांना एक लाखांची मदत देणार आहे असे त्यांनी सांगितले. शाळेत लहान मुल निबंध लिहितात मी शास्त्रज्ञ झालो तर, मी पंतप्रधान झालो तर अशीच वक्तव्य एक माणूस रोज करतोय. मी मुख्यमंत्री असतो तर हे केले असते तर, अस केले असते तसे केले असते. मात्र अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना घरात बसून राहिले. काहीच केलं नाही. आता घरात बसून निबंध लिहा लोकांच्या कामाचं आम्ही पाहू अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी केली. विधानसभा अध्यक्षांनी अभ्यासपूर्ण निकाल दिल्याचं मत देखील त्यांनी जाहीर सभेत केलं. (DCM Devendra Fadnavis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.