Shiv Sena : शिवसेनेतील प्रवेशाचा बांध आता फुटणार

खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे. पक्ष आणि चिन्हही त्यांचेच आहे, असा निकाल विधानसभेचे अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर यांनी दिल्यामुळे आता शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या आता येत्या काही दिवसांमध्ये वाढली जाण्याची शक्यता आहे. मुख्यनेता असलेल्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी अनेक शिवसेनेचे पदाधिकारी इच्छुक असून यासर्वांना तुर्तास बांधावरच अडवून ठेवले होते.

278
Shiv Sena : शिवसेनेतील प्रवेशाचा बांध आता फुटणार
Shiv Sena : शिवसेनेतील प्रवेशाचा बांध आता फुटणार

खरी शिवसेना (Shiv Sena) ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच आहे. पक्ष आणि चिन्हही त्यांचेच आहे, असा निकाल विधानसभेचे अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिल्यामुळे आता शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या आता येत्या काही दिवसांमध्ये वाढली जाण्याची शक्यता आहे. मुख्यनेता असलेल्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी अनेक शिवसेनेचे पदाधिकारी इच्छुक असून यासर्वांना तुर्तास बांधावरच अडवून ठेवले होते. परंतु या निर्णयामुळे आता बांध फुटला जाणार असल्याने येत्या काही दिवसांमध्ये शिवसेनेतील प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली जाणार आहे. त्यामुळे शिवसेनेत (Shiv Sena) महापूर येण्याची शक्यता आहे. (Shiv Sena)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांसह बाजुला होत शिवसेनेवर (Shiv Sena) दावा केला. आमदार, खासदारांसह माजी नगरसेवक तसेच पदाधिकारी हे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत आल्याने शिवसेना नाव आणि पक्ष हे शिंदे मुख्यनेता असलेल्या शिवसेना गटाला मिळाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शिवसेना (UBT) हे नाव ठेवत पक्षाची वाटचाल सुरु ठेवली आहे. परंतु आता विधानसभेचे अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनीही शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असून पक्ष आणि चिन्हही त्यांचेच असल्याचा निर्णय दिल्याने आजवर शिवसेनेत उद्धव ठाकरेंसोबत राहिलेल्या पदाधिकाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनाही मुख्यनेता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थांबवून ठेवले होते तर काही जण निकालाच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे निकाल मुख्यनेता असलेल्या शिवसेनेच्या बाजुने लागल्याने आता सर्वांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. (Shiv Sena)

(हेही वाचा – MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर ठाकरे गटातच वाद; सुभाष देसाई आणि अनिल देसाईंवर दोषारोप )

पदाधिकाऱ्यांनी सुचवलेली विकासकामे जलदगतीने 

त्यामुळे उबाठा (UBT) शिवसेनेसोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेतील प्रवेशासाठी थांबवून ठेवले होते, त्या सर्वांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे शिवसेनेत प्रवेशाचा महापूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या सरकारच्यावतीने पक्षाच्या वाढीसाठी पदाधिकाऱ्यांनी सुचवलेली विकासकामे जलदगतीने केली जात आहे. त्यामुळे आधीच महापालिका निवडणुकीचा पत्ता नाही. त्यातच माजी नगरसेवक तसेच इच्छुक उमेदवार यांना आगामी महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) पार्श्वभूमीवर सक्षम होण्यासाठी शिवसेना प्रवेशाशिवाय पर्याय नसल्याचे प्रत्यय येऊ लागला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शिवसेनेतील इन कमिंग वाढला जाईल, असे बोलले जात आहे. आतापर्यंत शिवसेनेत पक्षातील माजी नगरसेवकांसह आमदार, खासदारांनी प्रवेश केला आहे तसेच पदाधिकारीही मोठ्या संख्येने प्रवेश करू लागले आहेत. हे प्रमाण आता मोठ्या संख्येत दिसेल असेही बोलले जात आहे. (Shiv Sena)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.