TET Exam New Rule : बुरखा आणि मास्क घातल्यास ‘नो एन्ट्री’; परीक्षा केंद्रावर जाताना ‘ही’ काळजी घ्या

89
Maharashtra TET Exam logo with new rules announcement
New rules for Maharashtra TET Exam emphasize security.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतली जाणारी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा’ (TET) अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. यंदाच्या परीक्षेत कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार किंवा बोगस उमेदवारांचा प्रवेश रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांवर विशेष नियम लागू करण्यात आले आहेत. परीक्षा परिषदेने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार, आता चेहरा झाकणारे कपडे किंवा वस्तू परिधान करून परीक्षा केंद्रात प्रवेश करता येणार नाही.  (TET Exam New Rule)

(हेही वाचा – US Iran MoU: “इराण झुकला नाही, अमेरिका मजबूर झाली!”; इराणच्या सर्वोच्च नेत्याचा मोठा दावा)

नीट पेपरफुटीच्या (NEET Pepar Leack) प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेकडून कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. राज्यात २८ जूनला होणाऱ्या परीक्षेसाठी ६ लाखांहून अधिक उमेदवारांची नोंद  झाली आहे. प्रत्येक उमेदवाराची बायोमेट्रिक नोंद, फेसरेकग्निशन आणि ओळखपत्र पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण चेहरा स्पष्ट दिसणे अनिवार्य करण्यात आले आहे.  (TET Exam New Rule)

विशेषतः बुरखा किंवा चेहरा झाकणाऱ्या कोणत्याही पोशाखामुळे ओळख पटविण्यात अडचण येत असल्यास उमेदवारांना तो काढूनच तपासणी प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. परीक्षा केंद्रांवर मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी, एआय – आधारित सीसीटीव्ही देखरेख आणि थेट नियंत्रण कक्षातून निरीक्षण करण्यात येणार आहे. मोबाइल, स्मार्ट वॉच, कॅल्क्युलेटर यांसारखी इलेक्ट्रॉनिक साधने केंद्रात नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक पानावर युनिक क्रमांक आणि क्यूआर कोड देण्यात येणार असून, बोगस उमेदवार किंवा गैरप्रकार आढळल्यास तत्काळ फौजदारी कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे यंदाची टीईटी परीक्षा राज्यातील सर्वाधिक कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडणार आहे.

(हेही वाचा – Gold-Silver Rate Today : सराफा बाजारात मोठी घसरण! दागिन्यांचे दर कोसळले; सोने-चांदीचा आजचा भाव काय? )

दिव्यांग उमेदवारांसाठी विशेष सूचना
दिव्यांग उमेदवारांना (Disabled Student) लेखनिकाची सुविधा उपलब्ध असली, तरी त्यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची पूर्वपरवानगी आवश्यक राहणार आहे. लेखनिक हा बारावीपेक्षा अधिक शिक्षित नसावा, त्याचे वय १९ वर्षांपेक्षा कमी असावे आणि तो उमेदवाराच्या कुटुंबातील सदस्य नसावा. परीक्षेेच्या दिवशी अचानक लेखनिकाची मागणी स्वीकारली जाणार नाही, असे परिषदेने स्पष्ट केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.