Kalyan च्या सुभेदार वाडा कट्ट्याचा अनोखा उपक्रम; योगासनांचे धडे घेत विद्यार्थ्यांनी जोपासली आरोग्यसाधना

66
Kalyan च्या सुभेदार वाडा कट्ट्याचा अनोखा उपक्रम; योगासनांचे धडे घेत विद्यार्थ्यांनी जोपासली आरोग्यसाधना
Kalyan च्या सुभेदार वाडा कट्ट्याचा अनोखा उपक्रम; योगासनांचे धडे घेत विद्यार्थ्यांनी जोपासली आरोग्यसाधना
  • कल्याण : प्रतिनिधी

Kalyan : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (International Day of Yoga) कल्याणच्या सुभेदार वाडा कट्ट्यातर्फे शुक्रवारी सुभेदार वाडा हायस्कूलमध्ये योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सुमारे २०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध योगासने आणि प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर केली.

1004520510

(हेही वाचा – Yoga Sangam 2026 : आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी देश सज्ज; जाणून घ्या काय आहे यंदाची खास संकल्पना )

योगामुळे शारीरिक सुदृढता, मानसिक एकाग्रता, स्वयंशिस्त आणि स्मरणशक्तीचा विकास होतो. तसेच नियमित योगाभ्यासामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, याचे महत्त्व यावेळी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. कार्यक्रमादरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याने दररोज किमान ३० मिनिटे योग व प्राणायाम करण्याचा संकल्प केला. योगाचार्य संकल्प लिंगायत यांनी विद्यार्थ्यांना विविध योगप्रकारांचे मार्गदर्शन करत प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून घेतली. सुभेदार वाडा कट्ट्याचे अध्यक्ष दीपक जोशी, कोषाध्यक्ष अर्जुन पाटील आणि सभासद संजय पांडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कल्याणमधील प्रसिद्ध व्यावसायिक प्रफुल्ल गवळी, राजू गवळी, मुख्याध्यापक मारुती सोनमोरे, पर्यवेक्षक हेडगे, पी. टी. शिक्षक शांताराम पाटील आणि चव्हाण यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.