Dombivli मध्ये संतप्त महिलांचा केडीएमसीच्या कार्यालयावर हंडा-कळशी मोर्चा

87
Dombivli मध्ये संतप्त महिलांचा केडीएमसीच्या कार्यालयावर हंडा-कळशी मोर्चा
Dombivli मध्ये संतप्त महिलांचा केडीएमसीच्या कार्यालयावर हंडा-कळशी मोर्चा
  • कल्याण : प्रतिनिधी

Dombivli : पश्चिम डोंबिवलीकडे असलेल्या गरीबाचा वाडा येथील साईनगर परिसरात गेल्या तीन-चार महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाई (Water shortage) आहे. साईनगरच्या आजूबाजूकडील परिसरात मात्र पाणी पुरवठा योग्य दाबाने होत आहे. मग आमच्यावर अन्याय का ? असा सवाल साईनगरमधील महिलांनी केडीएमसीच्या (KDMC) पाणी पुरवठा विभागाकडे उपस्थित केला. जर पाणी नाही आले तर याच कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असा इशारा दिला. साईनगर मित्र मंडळाच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी डोंबिवलीतील केडीएमसीच्या ह प्रभाग क्षेत्र कार्यालयावर संतापलेल्या महिलांनी हंडा-कळशी मोर्चा काढला.

(हेही वाचा – US Iran MoU: “इराण झुकला नाही, अमेरिका मजबूर झाली!”; इराणच्या सर्वोच्च नेत्याचा मोठा दावा)

साईनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष हरीश म्हात्रे, रमेश जाधव, निरंजन मोरे, दिनेश लाड, कृष्णा शिंदे, कुंदन रामाने, अश्विनी म्हात्रे, प्रसाद बोले, प्रियंका बोले यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्च्यात महिलांनी केडीएमसी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. मोर्चेकऱ्यांनी केडीएमसीच्या पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता ओमकार भोईर यांच्याकडे निवेदन दिले. अभियंता भोईर यांनी वीज पुरवठा खंडीत, तर कधी खालच्या ठिकाणी पाणी पुरवठा होणे कठीण असते, अशी कारणे पुढे केली. पाणी कपतीचीही सबब सांगितल्यावर महिलांनी पाणी कपात फक्त साईनगर परिसरात आहे का ? आजूबाजूकडील परिसरात पाणी कसे येते ? असा प्रश्न उपस्थित केला. यावर मात्र अभियंता भोईर यांच्याकडे ठोस उत्तर नव्हते.

प्रशासकीय यंत्रणा फोल

साईनगर मित्र मंडळाचे रमेश जाधव यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, डोंबिवलीचे आमदार तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यावतीने गेल्या तीन महिन्यांपासून साईनगर परिसरार पाण्याचे टॅंकर दिले जात आहे. माजी नगरसेवक प्रकाश भोईर हे देखिल येथील पाणी समस्या सोडविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांनाही यश येत नाही. नागरिकांना पाणी पुरवठा करणे हे केडीएमसी प्रशासनाचे कर्तव्य आहे. मात्र पाणी पुरवठा करण्यात प्रशासकीय यंत्रणा फोल ठरल्याने अखेर महिलांना हंडा/कळशी मोर्चा काढावा लागल्याचे रमेश जाधव (Ramesh Jadhav) यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.