Gold-Silver Rate Today : सराफा बाजारात मोठी घसरण! दागिन्यांचे दर कोसळले; सोने-चांदीचा आजचा भाव काय? 

90
Gold bars with a downward trend arrow indicating price drop
Gold prices have significantly decreased today.

सोने आणि चांदी (Gold-Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी तसेच गुंतवणूकदारांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी आहे. शुक्रवार, 19 जूनला देशभरात सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Price) मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. भारतीय सराफा बाजारासोबतच मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवरही (MCX) मौल्यवान धातूंच्या किमती कमालीच्या घसरल्या आहेत. तर स्थानिक बाजारात तर सोन्या-चांदीच्या किमतीत थेट हजारो रुपयांचा फरक पडल्याने ग्राहकांची पावले पुन्हा एकदा सराफा बाजाराकडे वळू लागली आहेत. (Gold-Silver Rate Today)

(हेही वाचा – शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला उरलाय का? संजय राऊतांवर BJP चा थेट आणि तिखट हल्ला)

MCX वरील स्थिती

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) देखील शुक्रवार सकाळपासूनच कमालीची घसरण पाहायला मिळाली. एमसीएक्सवर सोने तब्बल 1,593 रुपयांनी प्रति 10 ग्रॅम स्वस्त झाले आहे, तर चांदीच्या दरात 6,057 रुपयांची घसरण नोंदवली गेली. सिल्व्हर एक्स्चेंज ट्रेडेड फंड्समध्ये जवळपास 5 टक्क्यांपर्यंत विक्रीचा दबाव दिसून आला. एमसीएक्सवर चांदीचा भाव घसरून सुमारे 2,37,620 रुपये प्रति किलोपर्यंत आला आहे. देशातील विविध शहरांमध्ये चांदीचा दर 2,38,700 रुपये ते 2,59,900 रुपये प्रति किलोच्या दरम्यान स्थिर आहे. (Gold-Silver Rate Today)

आजचा सोन्याचा भाव किती?

शहर (City) 24 कॅरेट  22 कॅरेट  18 कॅरेट 
दिल्ली (Delhi) ₹146,010 ₹133,850 ₹109,540
मुंबई (Mumbai) ₹145,860 ₹133,700 ₹109,390
कोलकाता (Kolkata) ₹145,860 ₹133,700 ₹109,390
चेन्नई (Chennai) ₹148,040 ₹135,700 ₹113,500
लखनऊ (Lucknow) ₹146,010 ₹133,850 ₹109,540
कानपूर (Kanpur) ₹146,010 ₹133,850 ₹109,540
पटना (Patna) ₹145,910 ₹133,750 ₹109,440
जयपूर (Jaipur) ₹146,010 ₹133,850 ₹109,540
इतूर/इंदूर (Indore) ₹145,910 ₹133,750 ₹109,440
भोपाळ (Bhopal) ₹145,910 ₹133,750 ₹109,440

चांदीतही मोठी घसरण

सोन्याबरोबरच चांदीच्या (Silver Price) दरातही मोठी घसरण झाली आहे. सिल्व्हर एक्स्चेंज ट्रेडेड फंड्समध्ये जवळपास ५ टक्क्यांपर्यंत विक्रीचा दबाव दिसून आला आहे. एमसीएक्सवर चांदीचा भाव घसरून सुमारे 2,37,620 रुपये प्रति किलोपर्यंत आला आहे. देशातील विविध शहरांमध्ये चांदीचा दर 2,38,700 रुपये ते 2,59,900 रुपये प्रति किलो दरम्यान आहे.

(हेही वाचा – Lohagad Tragedy : लग्नाचा मुहूर्त ठरला, घरी आनंदाचे वातावरण; पण लग्नाआधीच नवरदेवावर काळाचा घाला…)

सोन्या-चांदीच्या दरात घसरण का झाली?

भारतीय बाजारपेठेत गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीने विक्रमी पातळी गाठली होती. आता लग्नाचा हंगाम (Wedding Season) काहीसा संपल्यामुळे प्रत्यक्ष खरेदीत घट झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आता उच्च पातळीवर नफावसुली करत आहेत. तसेच, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने भविष्यात व्याजदर वाढवण्याचे संकेत दिले आहेत. जेव्हा व्याजदर वाढतात, तेव्हा गुंतवणूकदार सोन्यामधील गुंतवणूक काढून ती सरकारी रोख्यांमध्ये लावतात. यामुळे सोन्याची मागणी घटते आणि किमती कमी होतात.

हेही पहा –

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.