प्रतिनिधी
शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून भाजपाचे(BJP)प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यापेक्षा राऊतांनी औरंगजेबाचा इतिहास सांगावा, अशी मागणी करत त्यांनी ठाकरे गटाच्या हिंदुत्वावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राऊतांच्या कार्यपद्धतीचा चांगलाच समाचार घेतला.(BJP)
”शिवाजी महाराजांचा इतिहास हा स्वाभिमानाचा आणि हिंदुत्वाचा आहे, मात्र तुमचा इतिहास हा औरंगजेबाच्या चरणावर पक्ष अर्पण करण्याचा आणि अफझलखानाच्या कबरीवर माथा टेकवणाऱ्यांच्या सोबतीला राहण्याचा आहे,” असे खडे बोल नवनाथ बन यांनी सुनावले. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांना शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली.(BJP)
(हेही वाचा – Kolhapur : जन्मत:च दोन्ही हात नाहीत, तरी जिद्दीच्या जोरावर बनली मुंबई महापलिकेत अधिकारी; माऊली आडकुरची प्रेरणादायी कहाणी )
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच पुढे जात असल्याचे सांगत, त्यांनी उबाठा गटावर निशाणा साधला. “आजचा दिवस मूळ शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, उबाठा गटाचा नव्हे. उबाठा गटाने आपला वर्धापन दिन राहुल गांधींना विचारून साजरा करावा,” असा उपरोधिक सल्ला त्यांनी दिला. तसेच, २०१९ मध्ये मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनीच शिवसेनेचा आणि बाळासाहेबांच्या विचारांचा ‘लिलाव’ केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. पक्ष विकून किती कोटी रुपये मिळवले, याचे उत्तर राऊतांनी महाराष्ट्राला द्यावे, असे आव्हानच त्यांनी दिले.(BJP)
गिरीश महाजन यांच्यावर तत्कालीन मविआ सरकारने ‘मकोका’ अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र रचल्याचे सांगत, राऊतांचे हे प्रयत्न कसे फोल ठरले याची आठवणही त्यांनी करून दिली. “संजय राऊत, तुम्ही अडीच वर्षे सत्तेत असतानाही भाजपाचा एक साधा कार्यकर्ता फोडू शकला नाहीत, ही तुमची औकात आहे,” असे म्हणत त्यांनी राऊतांच्या राजकीय ताकदीची खिल्ली उडवली.(BJP)
आपल्याच भांडुपमधील प्रभागात नगरसेवक निवडून आणता येत नाही, त्यांनी भाजपाचे साठ तुकडे करण्याची स्वप्ने पाहू नयेत, अशा शब्दांत नवनाथ बन यांनी राऊतांची निर्भत्सना केली. राऊतांनी स्वतःचा वॉर्ड आणि आपला गट सांभाळावा, असा सल्ला देत या पत्रकार परिषदेत भाजपाने ठाकरे गटाच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकीय वातावरण तापवले आहे.(BJP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

