Taxpayers Hub : नागपुरात सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून कर साक्षरतेला चालना

तीन दिवसीय उपक्रमात जनतेचा उदंड सहभाग, स्पर्धा जनजागृती सत्र आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून कर साक्षरतेला चालना

112
समारोप सोहळ्यातील प्रमुख व्यक्तींचा दृश्य.
Taxpayers Hub : नागपुरात सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून कर साक्षरतेला चालना

‘प्रधान मुख्य प्राप्तिकर आयुक्त, नागपूर’ यांनी ‘प्राप्तिकर महासंचालनालय (PR & P&P), नवी दिल्ली’ च्या समन्वयाने ‘टॅक्सपेअर्स हब’ हा तीन दिवसांचा संपर्क कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचा शुक्रवारी नागपूरमधील टेम्पल रोडवरील चिटणवीस सेंटरच्या बन्यान सभागृहात समारोप झाला. (Taxpayers Hub)

नागपूरच्या श्री रामदेव बाबा अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते डॉ. विनोद असुदानी यांनी या समारोप सोहळ्याचे अध्यक्षपद भूषवले. यावेळी बोलताना डॉ. असुदानी यांनी, राष्ट्राच्या उभारणीतील एक महत्त्वपूर्ण स्तंभ म्हणून प्राप्तिकराचे महत्त्व विशद केले. यावेळी प्राप्तिकर प्रधान आयुक्त सुनील उमप, प्राप्तिकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे, आणि विभागाचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Taxpayers Hub)

(हेही वाचा – Bihar Election 2025 मध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर खासदारांनी मागितला प्रभारींचा राजीनामा)

करव्यवस्थेबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी नागपूरच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. प्रमुख अतिथी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागाचे कौतुक केले. (Taxpayers Hub)

तसेच विभागाने इतरही संपर्क उपक्रमांचे आयोजन केले. यामध्ये वर्ध्याच्या जीएस वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालयातील वादविवाद स्पर्धेचा आणि अमरावतीतील विद्याभारती महाविद्यालय येथे झालेल्या जनजागृती कार्यक्रमाचा समावेश होता. (Taxpayers Hub)

(हेही वाचा – Drone Farming : विदर्भात पिकांवर ड्रोनद्वारे फवारणी आणि त्याचे परिणाम)

तीन दिवसांच्या ‘टॅक्सपेअर्स हब’ कार्यक्रमाला नागरिक करदाते व्यावसायिक आणि विद्यार्थी यांनी उदंड प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –

  • टीडीएस, करसवलतीच्या तरतुदी, एसएफटी रिपोर्टिंग, आणि अटींची पूर्तता यांबद्दल जनजागृती सत्रे.
  • तक्रार निवारण आणि करदात्यांना सेवा देण्यासाठी इंटरॅक्टिव्ह किओस्क.
  • जबाबदार करभरणा या विषयावर आधारित पथनाट्ये, दंडार लोककला आदी सांस्कृतिक कार्यक्रम.
  • आभासी -वास्तव (VR) वर आधारित शैक्षणिक साधनांचा समावेश असलेला विशेष बालकोपरा.
  • विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा.

(हेही वाचा – मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; रविवारी रेल्वेच्या ‘या’ मार्गावर असणार Megablock)

या एकंदर कार्यक्रमामुळे विभागाचा करदात्यांशी मैत्रीपूर्ण दृष्टिकोनातून होणारा व्यवहार अधिक बळकट झाला, जनसंवाद वाढला आणि करविषयक अटींची पूर्तता स्वेच्छेने करण्याच्या वृत्तीस चालना मिळाली. ‘टॅक्सपेअर्स हब’ कार्यक्रम सफल करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व सहभागी व्यक्तींचे आणि प्रेक्षकांचे, ‘प्राप्तिकर विभाग, नागपूर’ने कौतुक केले. (Taxpayers Hub)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.