Taslima Nasrin म्हणाल्या,”मदरसे बनलेत जिहाद्यांचा कारखाना…”

 Taslima Nasrin म्हणाल्या,"मदरसे बनलेत जिहाद्यांचा कारखाना..."

91
 Taslima Nasrin 
 Taslima Nasrin 

प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन (Taslima Nasrin) कोलकातामध्ये शनिवारी १ ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. या ठिकाणी त्यांनी माध्यमांशी बोलताना मदरशांवर परखड टीका केली. तसेच त्यांनी बांगलादेशातील हिंदूंबाबत चिंता व्यक्त केली. तसंच त्या म्हणाल्या की बांगलादेशात हिंदू महिलांकडे त्यांचे मूलभूत अधिकार नाहीत. तसंच त्यांना वारस ठरवण्याचाही अधिकार नाही. बांगलादेशातील हिंदूंची अवस्था बिकट आहे असं त्यांनी म्हटलं आहे.(Taslima Nasrin madrasa remarks)

बांगलादेशातील हिंदूंबाबतही व्यक्त केली चिंता

बांगलादेशात १९५६ च्या हिंदू कायद्याची अंमलबजावणी पुन्हा एकदा केली जाण्याची गरज आहे. तसंच त्या युनिफॉर्म सिव्हिल कोडबाबतही बोलल्या. तस्लीमा नसरीन म्हणाल्या एक देश एक कायद्याच्या चर्चा आपण करतो. त्यामुळे महिलांसाठीही कायदा समान असला पाहिजे. त्यांना महत्त्व मिळालं पाहिजे. बांगलादेशात यूसीसी सारखा कायदा आला तर महिलांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळतील. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. बेगम खलिदा जिया आणि मोहम्मद युनूस यांच्या कार्यकाळातही अशा घटना घडल्या आहेत असंही त्या म्हणाल्या. यानंतर त्यांना मदरशांबाबत एका पत्रकाराने प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी त्याचंही उत्तर दिलं.(Taslima Nasrin madrasa remarks)

(हेही वाचा – पोलिसांचा गणवेश घालून जंतर मंतरमध्ये गोंधळ घाला; CJP च्या आंदोलनात जैश-ए-मोहम्मदचा होता कट)

मदरशांमधून फक्त जिहादी जन्म घेतात

तस्लीमा नसरीन (Taslima Nasrin) मदरशांबाबतच्या प्रश्नाबाबत म्हणाल्या की, “त्या ठिकाणी म्हणजेच मदरशांमध्ये फक्त जिहादी जन्माला घातले जातात. सगळ्या मदरशांचं रुपांतर हे धर्मनिरपेक्ष शाळांमध्ये केलं गेलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे. बांगलादेशात खुल्या विचारांचे लोक राहू शकत नाही आजही त्यांच्यावर पलायन करण्याची वेळ येते ही बाब दुर्दैवी आहे”, असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच बांगलादेशात शेख हसीना यांनी परतलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे.(Taslima Nasrin madrasa remarks)

कोण आहेत तस्लीमा नसरीन?

तस्लीमा नसरीन(Taslima Nasrin) या प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका आहेत. ‘लज्जा’, फेरा, बेशरम या त्यांच्या कादंबऱ्या गाजल्या आहेत. मुस्लीम समाजातील अनिष्ट प्रथांवर ताशेरे झाडल्याने त्यांना बांगलादेशातून बहिष्कृत करण्यात आले होते. त्यांच्याविरोधात जारी करण्यात आलेल्या फतव्यामुळे त्यांना बांगलादेश सोडावा लागला होता. भारताने त्यांना आश्रय दिला. त्या अनेक दशकांपासून तात्पुरत्या आणि नूतनीकरण करण्यायोग्य निवासी परवान्यांवर भारतात राहत आहेत आणि बरीच वर्षे कोलकाता येथे वास्तव्यास होत्या. २००७ मध्ये त्यांना कोलकाता सोडावं लागलं. कारण फुटीरतावाद्यांनी त्यांच्या बंगालमध्ये असण्याबाबत आक्षेप घेतला होता. तस्लीमा नसरीन यांच्या विरोधात मोर्चे निघाले होते. डाव्याचं सरकार तेव्हा बंगालमध्ये होतं. या सरकारने तस्लीमा नसरीन यांची हकालपट्टी केली होती. २०११ मध्ये तृणमूल काँग्रेसचं सरकार आलं, पण त्या बंगालमधे परतू शकल्या नव्हत्या. आता भाजपाच्या कार्यकाळात १९ वर्षांनी त्या कोलकाता या ठिकाणी आल्या. त्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.(Taslima Nasrin madrasa remarks)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.