Swimming Pool : अंधेरी (पूर्व), वरळी आणि विक्रोळी येथील तरण तलाव लवकरच सुरू

शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांना शुल्कामध्ये सवलत; महिलांसाठी विशेष बॅच

4439
Swimming Pool: मुंबईतील महापालिकेचे पहिले उत्तुंग जलतरण तलाव
Swimming Pool: मुंबईतील महापालिकेचे पहिले उत्तुंग जलतरण तलाव
मुंबई महानगरपालिकेतर्फे (Municipal Corporation) अंधेरी (पूर्व), वरळी आणि विक्रोळी येथील तरण तलावांसाठी (Swimming Pool) बुधवार, ६ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ वाजेपासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू होणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर ही नोंदणी होणार आहे. (Swimming Pool)
मुंबईकर नागरिकांना पोहणे या क्रीडा व व्यायाम प्रकाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात मुंबई महानगरपालिकेकडून (Municipal Corporation) तरण तलावांची (Swimming Pool) सुविधा देण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त (Municipal Commissioner) तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल (Dr. Iqbal Singh Chahal) व अतिरिक्त  आयुक्त (पूर्व उपनगरे)  आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार व मान्यतेनुसार जे. बी. नगर मेट्रो स्थानकाजवळ, कोंडिविटा, अंधेरी (पूर्व), वरळी हिल जलाशय परिसर, वरळी आणि राजर्षि शाहू महाराज उद्यानाजवळ, टागोर नगर, विक्रोळी या तीन परिसरातील तरण तलावांसाठी नव्याने ऑनलाईन सभासद नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त (उद्याने)  किशोर गांधी यांनी दिली आहे. या तरण तलावासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी https://swimmingpool.mcgm.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. ही प्रवेश प्रक्रिया “प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य” या पद्धतीने सुरू आहे. (Swimming Pool)
सभासदत्व घेणाऱ्या सभासदांना तरण तलावाचे (Swimming Pool) नियम व सुरक्षा संबंधी सर्व नियम यांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर आवश्यक त्या कागदपत्रांची व वैद्यकीय प्रमाणपत्रांची पूर्तता केल्यानंतरच सदर सभासदत्व अंतिम होणार आहे, याची सर्व संबंधितांनी आवर्जून नोंद घ्यावी. (Swimming Pool)
वरील तीनही तरण तलावांत (Swimming Pool) सर्वसाधारण प्रवर्गासाठी रुपये ८ हजार ८३६ इतके वार्षिक सभासदत्व शुल्क आहे. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक, मुंबई महानगरपालिका (Municipal Corporation) कर्मचारी, निवृत्त महानगरपालिका (Municipal Corporation) कर्मचारी आणि नगरसेवक यांना शुल्कात सूट देत रुपये ४ हजार ५८६ इतके वार्षिक शुल्क आकारण्यात येणार आहे. पुरुषांसाठी या तीनही तरण तलावात पोहण्याची वेळ सकाळी ६ ते सकाळी ११ आणि सायंकाळी ६ ते रात्री १० अशी असेल. (Swimming Pool)
तसेच या तीनही तरण तलावात (Swimming Pool) सकाळी ११ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते ६ या कालावधीत महिलांसाठी विशेष बॅच असेल. या बॅचला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी वार्षिक सभासदत्व शुल्क हे रुपये ६ हजार ७१६ इतके आहे. तसेच शालेय विद्यार्थिनी, ज्येष्ठ महिला, दिव्यांग महिला, मुंबई महानगरपालिका महिला कर्मचारी, निवृत्त महानगरपालिका महिला कर्मचारी आणि महिला नगरसेवक यांनादेखील रुपये ४ हजार ५८६ इतके वार्षिक शुल्क आकारण्यात येणार आहे, असे जलतरण तलाव आणि नाट्यगृहांचे समन्वयक  संदीप वैशंपायन यांनी कळविले आहे. (Swimming Pool)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.