Lok Sabha election 2024 : ‘ही’ १४ राज्ये इंडी आघाडीला दाखविणार कात्रजचा घाट

204
Lok Sabha Election : काँग्रेसची ४३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

वंदना बर्वे

लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha election 2024) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्ताच्यूत करण्याची स्वप्न पाहणा—या इंडी आघाडीतील घटक पक्षांसाठी वाईट बातमी आहे. देशातील 14 राज्ये अशी आहेत जेथे 2019 च्या निवडणुकीत भाजपला (BJP) 50 टक्क्यापेक्षा जास्त मते मिळाली होती. 2024 च्या निवडणुकीत हीच राज्य इंडी आघाडीला कात्रजचा घाट (Katraj Ghat) दाखविणार आहे. (Lok Sabha election 2024)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha election 2024) मैदानात कंबर कसून उतरला आहे. ‘अब की बार चारसौ पार’ची घोषणा देत मैदानात उतरलेल्या भाजपने 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून विरोधकांवर आपले वर्चस्व सिध्द केले आहे. (Lok Sabha election 2024)

(हेही वाचा- Udhayanidhi Stalin : हिंदू धर्माला डेंग्यू म्हणणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले)

मात्र, नरेंद्र मोदी यांना सत्ताच्यूत करून स्वत: सत्तेत येण्याचे स्वप्न पाहणा—या इंडी आघाडीतील (NDA) घटक पक्षांसाठी वाईट बातमी आहे. देशातील 14 राज्ये अशी आहेत जेथे 2019 च्या निवडणुकीत भाजपला (BJP) 50 टक्क्यापेक्षा जास्त मते मिळाली होती. 2024 च्या निवडणुकीत (Lok Sabha election 2024) हीच राज्य इंडी आघाडीला (NDA) कात्रजचा घाट (Katraj Ghat) दाखविणार आहे.

याच 14 राज्यांमध्ये भाजप (BJP) विरोधकांना खिंडित गाठणार आहे. कारण, 2019 च्या निवडणुकीत भाजपला या 14 राज्यांतील 224 जागांवर मध्ये 50 टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती. भाजपला 303 जागा आणि एनडीएला 351 जागा जिंकण्यात या राज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या राज्यांमध्ये भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी विरोधकांना केवळ संयुक्त उमेदवार देवून चालणार नाही तर बरेच काही करावे लागेल. (Lok Sabha election 2024)

कोणती आहेत ती 14 राज्ये

2019 च्या निवडणुकीत 224 जागांवर मध्ये 50 टक्क्यांहून अधिक मते देणारी ती 14 राज्ये कोणती? तर ती राज्ये आहेत गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, गोवा, दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि चंदीगड.
केंद्रशासित प्रदेश चंदीगडसह या 14 राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण 244 जागा आहेत. यातील   217 जागा भाजपने जिंकल्या होत्या. उत्तर प्रदेशातील अपना दलाने जिंकलेल्या दोन जागा जोडल्या तर त्या 219 होतात. 50 टक्के मतांचा उंबरठा ओलांडल्यानंतर पक्षाला पराभूत करण्यासाठी कोणतीही आघाडी जोपर्यंत भाजपच्या (BJP) व्होटबँकेला धक्का लावण्यात आणि तिची व्होटबँक त्यापलीकडे नेण्यात यशस्वी होत नाही तोपर्यंत विरोधकांना स्वप्नातही यश मिळणे कठीण आहे. (Lok Sabha election 2024)

(हेही वाचा- Brahmin : अभिनेत्री केतकी आणि बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्यावरील खोटे गुन्हे तत्काळ मागे घ्या; सकल ब्राह्मण समाजाची मागणी)

मोदींची लोकप्रियता वाढत आहे

जागानिहाय आकडेवारीवरही नजर टाकली तर भाजपने (BJP) गेल्या वेळी ५० टक्क्यांहून अधिक मते मिळवून मिळवलेल्या २२४ जागा या बहुमताच्या २७२ जागांपेक्षा केवळ ४८ जागा कमी आहेत.  प्रत्येक निवडणूक वेगळी असते हे खरे असले तरी आणि 2019 च्या आकडेवारीच्या आधारे 2024 चा निष्कर्ष काढणे योग्य नाही हे खरे असले तरी वस्तुस्थिती अशी आहे की 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी होण्याऐवजी वाढतच आहे. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha election 2024) निकाल यचा पुरावा आहे.

2014 मध्ये भाजपने 50 टक्के अधिक मतांसह 136 जागा जिंकल्या होत्या. 2019 मध्ये त्या वाढून 224 झाल्या. त्याचप्रमाणे, 2014 मध्ये भाजपने (BJP) दोन लाखांहून अधिक मतांच्या फरकाने 11 जागा जिंकल्या आणि तीन लाखांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने 4 जागा जिंकल्या, ज्यांची संख्या 2019 मध्ये अनुक्रमे 164 आणि 10 वर पोहोचली. (Lok Sabha election 2024)

(हेही वाचा- Mandapeshwar Guha Shiva Temple: बोरिवलीत मंडपेश्वर गुहा शिव मंदिराचे सौंदर्यीकरण, तीन दिवसीय महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन)

बिहार आणि महाराष्ट्र महत्त्वाचे ठरू शकतात

2024 मध्ये एनडीएसाठी बिहार आणि महाराष्ट्र हे दोन राज्ये महत्त्वपूर्ण ठरू शकतात. या दोन्ही राज्यांमध्ये एनडीएला ५० टक्क्यांहून अधिक मतांसह बहुतांश जागा जिंकण्यात यश आले होते. बिहारमध्ये भाजपने 17 जागा जिंकल्या होत्या. जेडीयूने 16 तर एलजेपीने सहा जागा जिंकल्या. अशा प्रकारे एनडीएला 40 पैकी 39 जागा मिळाल्या होत्या. नितीशकुमार यांच्या पुनरागमनानंतर बिहारमध्ये भाजपने (BJP) सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. एवढेच नव्हे तर, जीतनराम मांझी यांचा हम पक्ष आणि आरएलएसपी एकत्र आल्यानंतर जातीय समीकरणेही घट्ट झाली आहेत. (Lok Sabha election 2024)

41 जागा जिंकण्यात यश आले

गेल्या वेळी महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युतीने ४८ पैकी ४१ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतांसह विजय मिळवला होता. मात्र यावेळी शिवसेनेत फूट पडली आहे. इतकेच नाही तर गेल्या वेळी विरोधी पक्षात असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही दुभंगला असून अजित पवार एनडीएसोबत आले आहेत. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा समावेश असलेला एनडीए मागच्या वेळेप्रमाणेच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात यशस्वी ठरतो का? याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून आहे (Lok Sabha election 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.