Udhayanidhi Stalin : हिंदू धर्माला डेंग्यू म्हणणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरियाशी केल्यानंतर आणि सनातन धर्माचे उच्चाटन व्हायला हवे असे म्हणत मोठा वाद निर्माण केला होता.

173
Udhayanidhi Stalin : हिंदू धर्माला डेंग्यू म्हणणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

तामिळनाडूचे मंत्री आणि द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. सनातन धर्माची डेंग्यू-मलेरियाशी तुलना करून त्याच्या उच्चाटनासंदर्भात वक्तव्य करणाऱ्या स्टॅलिन यांनी यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळताना न्यायालयाने त्यांना परखड शब्दांत सुनावलं आहे. ‘तुम्ही तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा गैरवापर केल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याच्या अधिकाराचा दावा करताय?’ असा सवाल न्यायालयानं उदयनिधी स्टॅलिन यांना केला आहे.

(हेही वाचा – Mahadev Jankar महायुतीतून बाहेर? पुण्याच्या महायुती बैठकीचं महादेव जानकरांना निमंत्रण नाही)

तुम्ही कोणी सामान्य व्यक्ती नाही :

याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने म्हटले की, तुम्ही कलम 19 (1) (अ) अंतर्गत तुमच्या अधिकाराचा गैरवापर करता. तुम्ही कलम 25 अंतर्गत तुमच्या अधिकाराचा गैरवापर करता. आता तुम्ही कलम 32 अंतर्गत तुमच्या अधिकाराचा वापर करत आहात तुम्ही जे बोललात त्याचे परिणाम तुम्हाला माहीत नाहीत का? तुम्ही सामान्य व्यक्ती नाही. तुम्ही मंत्री आहात. तुम्हाला त्याचे परिणाम माहित असले पाहिजेत. (Udhayanidhi Stalin)

२०२३ मध्ये केले वादग्रस्त विधान :

तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरियाशी केल्यानंतर आणि सनातन धर्माचे उच्चाटन व्हायला हवे असे म्हणत मोठा वाद निर्माण केला होता. (Udhayanidhi Stalin)

(हेही वाचा – Brahmin : अभिनेत्री केतकी आणि बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्यावरील खोटे गुन्हे तत्काळ मागे घ्या; सकल ब्राह्मण समाजाची मागणी)

एका कार्यक्रमात सहभागी होताना उदयनिधी म्हणाले,

“अशा काही गोष्टी आहेत ज्यांचे आपण उच्चाटन केले पाहिजे आणि आपण केवळ विरोध करू शकत नाही. डास, डेंग्यू, कोरोना आणि मलेरिया या अशा गोष्टी आहेत ज्यांना आपण विरोध करू शकत नाही, त्यांचे आपण उच्चाटन केले पाहिजे. सनातन देखील असेच आहे.” (Udhayanidhi Stalin)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.