BMC Swimming Pool : गिलबर्ट हिल येथील महापालिकेच्या जलतरण तलावाला ‘छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव’ असे नाव

159
BMC Swimming Pool : गिलबर्ट हिल येथील महापालिकेच्या जलतरण तलावाला 'छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव' असे नाव
BMC Swimming Pool : गिलबर्ट हिल येथील महापालिकेच्या जलतरण तलावाला 'छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव' असे नाव

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने अंधेरी (पश्चिम) स्थित गिलबर्ट हिल येथे मुंबई महानगरपालिकेतर्फे नव्याने बांधण्यात आलेल्या (BMC Swimming Pool) आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावाला ‘छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव’ असे नाव देण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. गिल्बर्ट हिल परिसर हे मुंबईतील पर्यटनाचे आकर्षण ठरेल, या अनुषंगाने परिसराचा विकास करण्यात येईल, अशी ग्वाहीही लोढा यांनी दिली.

(हेही वाचा – Naval Commanders’ Conference : नवी दिल्ली येथे 4 ते 6 सप्टेंबर या कालावधीत दुसरी नौदल कमांडर्स परिषद होणार)

गिलबर्ट हिल येथे मुंबई महानगरपालिकेतर्फे नव्याने बांधण्यात आलेल्या जलतरण तलावाचे लोकार्पण मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते रविवारी ३ सप्टेंबर २०२३) संपन्न झाले.या सोहळ्याला राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार अमीत साटम, आमदार राजहंस सिंह, महानगरपालिकेचे उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी, के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान आणि विविध मान्यवर उपस्थित होते.

BMC Swimming Pool : गिलबर्ट हिल येथील महापालिकेच्या जलतरण तलावाला 'छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव' असे नाव
BMC Swimming Pool : गिलबर्ट हिल येथील महापालिकेच्या जलतरण तलावाला ‘छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव’ असे नाव
या परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास

दुबईतील सर्वाधिक आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून बुर्ज खलिफा ही अतिशय उंच इमारत प्रसिद्ध आहे. मुंबईतील गिल्बर्ट हिलही भूवैज्ञानिक वारसा म्हणून अतिशय मोलाचे आहे. या परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा. त्यासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही, यातून देश-विदेशातील पर्यटक येथे भेट देतील आणि मुंबईचे पर्यटन महत्त्व आणखी वाढेल, असे नमूद करून पुढील वर्षभरात या परिसराला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठीच्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. (BMC Swimming Pool)

स्थानिक आमदार अमीत साटम संबोधित करताना म्हणाले की, गिल्बर्ट हिल येथील गावदेवी मंदिरामध्ये जाण्यासाठी भाविकांना दर्शनाची सुविधा म्हणून याठिकाणी लिफ्टची सुविधा देण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकरच या प्रकल्पाला सुरूवात होईल, असे त्यांनी सांगितले. (BMC Swimming Pool)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.