माथेरान टॉय ट्रेनला विशेष एसी सलून कोच जोडणार

119

मध्य रेल्वे प्रवाशांसाठी माथेरान टॉय ट्रेनला विशेष एसी कोच जोडण्यात येणार आहे. टॉय ट्रेनला जोडलेला एसी सलून कोच हा आठ आसनी कोच असून ट्रेनच्या वेळा आणि एसी कोचचे शुल्क खालीलप्रमाणे आहेतः

ट्रेनच्या वेळा

नेरळ ते माथेरान

  • ट्रिप A – नेरळवरून सकाळी 08.50 वाजता सुटेल आणि माथेरानला सकाळी 11.30 वाजता पोहोचेल.
  • ट्रिप B – नेरळवरून सकाळी 10.25 वाजता सुटेल आणि माथेरानला दुपारी 01.05 वाजता पोहोचेल.

माथेरान ते नेरळ

  • ट्रिप C – माथेरानवरून 02.45 वाजता सुटेल आणि नेरळला दुपारी 04.30 वाजता पोहोचेल.
  • ट्रिप D – माथेरानवरून दुपारी 04.00 वाजता सुटेल आणि नेरळला संध्याकाळी 06.40 वाजता पोहोचेल.

भाडे रचना

  • एकाच दिवशीच्या राऊंड ट्रिपसाठी भाडे : आठवड्याच्या दिवशी (सोम-शुक्र) रु. ३२,०८८/- करांसह, आठवड्याअखेरीस (वीकेंडला) रु. ४४,६०८/- करांसह.
  • एकाच दिवसाच्या राऊंड ट्रिपच्या प्रवासासाठी ए, सी किंवा बी डी यापैकी एकाचा पर्याय निवडता येतो.
  • रात्रभर मुक्कामासह राउंड ट्रिप : आठवड्यातील दिवशी रु. ३२,०८८/- करांसहीत रु. १,५००/- प्रति तासाने.
  • आठवड्याअखेरीस (वीकेंडला) रात्रभर मुक्कामासह राउंड ट्रिप प्रवासासाठी रु. ४४,६०८/- करांसह डिटेंशन शुल्कासह रु. १,८००/- प्रति तासाने.

प्रवासी प्रवासाच्या तारखेच्या ७ दिवस अगोदर एसी सलून बुक करू शकतात. सुरूवातीला १० हजार भरून उर्वरित ८०% रक्कम प्रवासाच्या तारखेच्या ४८ तास अगोदर रक्कम भरावी लागेल, असे न केल्यास आगाऊ रक्कम आणि सुरक्षा ठेव जप्त केली जाईल आणि बुकिंग रद्द झाली असे मानले जाईल. ४८ तासांच्या आत बुकिंग रद्द केल्यास कोणताही परतावा दिला जाणार नाही. अधिक माहितीसाठी मुख्य बुकिंग पर्यवेक्षक, नेरळ यांच्याशी संपर्क साधा असे सांगण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.