BMC : “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा’’ यंदा १४ जानेवारी २०२४ रोजी

यंदा ही स्पर्धा मुंबईतील विविध ४५ ठिकाणी प्रामुख्याने उद्यानांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

450
BMC :
BMC : "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा’’ यंदा १४ जानेवारी २०२४ रोजी

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे ‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा’ चे आयोजन दरवर्षी जानेवारी महिन्यातील दुसऱ्या रविवारी करण्यात येते. यानुसार यंदाही महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) आणि अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार ही बालचित्रकला स्पर्धा रविवारी १४ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या पूर्वनियोजनासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली ११ डिसेंबर २०२३ महानगरपालिका मुख्यालयात बैठक पार पडली. (BMC)

तब्बल ६ लाख ९० हजार रुपये रोख रकमेची बक्षिसे

यंदा ही स्पर्धा मुंबईतील विविध ४५ ठिकाणी प्रामुख्याने उद्यानांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. तर या स्पर्धेत उत्कृष्ट चित्रे चितारणाऱ्या स्पर्धकांसाठी ५०० रुपये ते २५ हजारा रुपयांपर्यंतची मिळून तब्बल ५५२ एवढी ६ लाख ९० हजार रुपये रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रत्येक स्पर्धकाला प्रशस्तिपत्रही देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या ठिकाणी पुरेशा सुविधा उपलब्ध होतील, यासाठीचे नियोजन विभागीय पातळीवर करावे, असे निर्देश आश्विनी भिडे यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत. (BMC)

इयत्ता पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यासाठी हे विषय…

प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील ‘माझी मुंबई’ या मध्यवर्ती संकल्पनेवर भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन महानगरपालिकेद्वारे (BMC) करण्यात येत आहे, असे याबाबात माहिती देताना शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी यांनी सांगितले. ते म्हणाले, स्पर्धेचे यंदा १५ वे वर्ष असून यावर्षी ही स्पर्धा एकूण ४ गटात घेण्यात येणार आहे. या स्पर्धेअंतर्गत इयत्ता पहिली व दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक १ करिता ३ विषय ठरवण्यात आले आहेत. यामध्ये मी पाण्यात खेळतो, मी पाणीपुरी/भेळ खातो, माझे आनंदी कुटुंब असे ३ विषय आहेत. (BMC)

(हेही वाचा – Onion producers export issue : कांदाप्रश्नी श्रेयासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात चुरस…)

इयत्ता तिसरी ते पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी…

तर इयत्ता तिसरी ते पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक २ करिता ३ विषय निश्चित करण्यात आले आहेत. आम्ही कपड्यांच्या दुकानात, आम्ही समुद्रातील बोटीत, आम्ही सायकल चालवतो असे ३ विषय आहेत. (BMC)

सहावी ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी…

इयत्ता सहावी ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक ३ करिता मी आई बाबांस घरकामात मदत करतो/करते, आम्ही वर्ल्डकपची मॅच पाहतो, शाळेचा बक्षीस समारंभ असे ३ विषय आहेत. (BMC)

इयत्ता नववी ते दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी… 

तर इयत्ता नववी ते दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक ४ करिता ३ विषय निश्चित करण्यात केले आहेत. यामध्ये माझी पर्यावरणपूरक/प्रगतिशील मुंबई, नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्यांना मदतकार्य, ऊर्जा संवर्धन असे ३ विषय आहेत. (BMC)

(हेही वाचा – Pune By-Elections : पुण्यात मणिपूरसारखी स्थिती होती का; उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारले)

चारही गटातील स्पर्धकांसाठी एकूण ५५२ रोख पारितोषिके …

या चारही गटातील स्पर्धकांसाठी मिळून एकूण ५५२ रोख पारितोषिके असतील. या अंतर्गत प्रत्येक गटात रुपये २५ हजारांचे प्रथम पारितोषिक, रुपये २० हजारांचे द्वितीय पारितोषिक, रुपये १५ हजारांचे तृतीय पारितोषिक आणि रुपये ५ हजारांची १० पारितोषिके असणार आहेत. तर या व्यतिरिक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक विभाग स्तरावर उत्तम चित्रांसाठी रुपये ५००/- इतक्या रकमेची एकूण पाचशे रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. (BMC)

जाहिरातींवर देणार अधिक भर…

तरी या स्पर्धेत मुंबईतील सर्व भाषिक महानगरपालिका शाळा, खासगी अनुदानित शाळा, विना-अनुदानित प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी विविध समाज माध्यमांचा पर्याय देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना YouTube Live, Google Classroom, Google Meet, Zoom meeting च्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच Whatsapp, टेलिग्राम, फेसबुकच्या माध्यमातून जाहिरात प्रसारित करण्यात येईल. सर्व शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी या स्पर्धेच्या निमित्ताने केले आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.