Amit Shah : …तर पाकव्याप्त काश्मीर निर्माण झाला नसता; अमित शाह यांनी सांगितल्या जवाहरलाल नेहरूंच्या चुका

206

राज्यसभेत सोमवार, ११ डिसेंबर रोजी जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक २०२३ या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. त्यावेळी त्यांनी १९४७च्या काळाची आठवण करून देत पाकिस्तानसोबत जर यावेळी युद्धबंदी जाहीर केली नसती तर आज पाकव्याप्त काश्मीर निर्माणच झाला नसता. सगळा पाकव्याप्त काश्मीर हा भारताच्या तिरंग्याखाली आला असता, पण जवाहरलाल नेहरूंमुळे हे शक्य झाले नाही, असा घणाघाती हल्ला अमित शाह (Amit Shah) यांनी केला.

काय म्हणाले अमित शाह? 

जवाहरलाल नेहरू यांनी अजून २ दिवस युद्ध सुरु ठेवले असते, तरी पीओकेची समस्या निर्माण झाली नसती. खरे तर स्वातंत्र्यानंतर काश्मीरपेक्षा हैद्राबाद हे संस्थान भारतात समाविष्ट करून घेण्याचे आव्हान होते, पण तिथे नेहरू गेलेच नाही. जुनागड, लक्षद्वीप, जोधपूर येथेही गेले नाहीत. नेहरूंनी फक्त काश्मीरकडेच पाहिले आणि तोही विषय अर्धवट सोडला. काश्मीरच्या विलीनीकरणाला उशीर का झाला? काँग्रेसने इतिहास १ हजार फूट खोल गाडला तरी सत्य बाहेर येणारच, असा घणाघाती हल्ला अमित शाह (Amit Shah) यांनी केला.

(हेही वाचा मोदी सरकारचा Christian Missionary यांना दणका; ४५०० चर्चवर नियंत्रण असणाऱ्या संस्थेला आता परदेशी निधी मिळणार नाही)

शेख अब्दुल्लाच्या विनंतीमुळे काश्मीरच्या विलीनीकरणाचा विषय प्रलंबित ठेवण्यात आला. देशात जेवढ्या संस्थानांचे विलीनीकरण करण्यात आले पण कुठेही ३७० कलम लावले नाही. मग काश्मीरमध्ये ३७० का लावले? ही अट कोणी घातली? कुणाच्या विनंतीमुळे केली? याचे उत्तर देशातील जनतेला द्यावेच लागेल. या प्रश्नापासून तुम्ही पळून जाऊ शकत नाही, अशी टीकाही शाह यांनी केली. सरदार पटेलांच्या विनंतीनंतर नेहरूंनी काश्मीरमध्ये सैन्य पाठवले. हे नेहरू मेमोरियलमधील पुस्तकात स्वतः नेहरूंनीच म्हटले आहे, असेही मंत्री अमित शाह (Amit Shah) म्हणाले.

नेहरूंनी काश्मीर हा विषय संयुक्त राष्ट्रात जाण्याची चूक केली. ते चुकीच्या कलमाखाली संयुक्त राष्ट्रात गेले. त्यामुळे नुकसान झाले. जम्मू काश्मीरमध्ये ठराविक कुटुंबच सरकार चालवत होती, असेही शाह म्हणाले. पराभवात विजय शोधण्याची कला काँग्रेसकडून शिकली पाहिजे. आज सर्वोच्च न्यायालयाने कलम 370 हटवल्याचा निर्णय योग्य ठरवला, पण काँग्रेस तो निर्णय चुकीचा ठरवत आहे, काँग्रेसला वास्तव समजून घ्यावे लागेल, हा हिंदू-मुस्लिमाचा विषय नाही, असेही गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.