Saur Kushi Vahini Scheme 2.0 : शेतकऱ्यांना आता दिवसाही विजेचा लाभ घेता येणार; ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी सरकारकडून ९००० मे वॅाट च्या निविदा अंतिम करण्यात आल्या असून यातून ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

163
Saur Kushi Vahini Scheme 2.0 : शेतकऱ्यांना आता दिवसाही विजेचा लाभ घेता येणार; ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता दिवसाही वीज मिळणार आहे. त्यामुळे रात्रीअपरात्री शेतीचे पंप सुरु ठेवण्यासाठीचा शेतकऱ्यांचा खटाटोप संपणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा थ्री फेज वीज (Saur Kushi Vahini Scheme 2.0) मिळत नाही. त्यामुळे त्यांना रात्रीच्या वेळी शेतीला पाणी पुरवठा करावा लागतो. रात्रीच्या वेळी शेताकडे जाताना जनावरांकडून शेतकऱ्यांवर हल्ला होण्याच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. यामुळे दिवसाही पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा करण्याची मागणी होत आहे.

(हेही वाचा – Maratha Reservation : मराठा आरक्षण विरोधी याचिकेवर भूमिका स्पष्ट करा, हायकोर्टाची सरकारला नोटीस)

मुख्यमंत्री सौर कुषी वाहीनी योजना २.० :

अशात आता सरकारने राज्यातील कृषी क्षेत्रासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवसाचा देखील वीज पुरवठा पुरेशा क्षमतेने होणे शक्य होणार आहे. मुख्यमंत्री सौर कुषी वाहीनी योजना २.० (Saur Kushi Vahini Scheme 2.0) सुरु करण्यासाठी आज म्हणजेच गुरुवार ७ मार्च रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हुडको सोबत करार करण्यात आला.

हा दिवस महाराष्ट्राच्या कृषि जगतात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल :

शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकऱ्यांची ही मागणी सरकारकडून लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. शेतीसाठी दिवसा वीज मिळावी, ही सातत्याने होणारी मागणी होती, ही पूर्ण करणे आता शक्य होणार आहे. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्राच्या कृषि जगतात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, अशा भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केल्या. (Saur Kushi Vahini Scheme 2.0)

(हेही वाचा – Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेची सुनावणी 1 एप्रिलपर्यंत दस्तावेज सादर करा)

४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक :

शेतकऱ्यांना दिवसा वीज (Saur Kushi Vahini Scheme 2.0) मिळावी यासाठी सरकारकडून ९००० मे वॅाट च्या निविदा अंतिम करण्यात आल्या असून यातून ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. तसेच, यामुळे २५ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. शेतकऱ्यांना १.२५ लाख रुपये प्रतिहेक्टर वार्षिक भाडे मिळणार आहे. २०२५ मध्ये ४० टक्केकृषि फिडर सौर ऊर्जेवर येणार आहे. १८ महिन्यात प्रकल्प पूर्ण करण्याची सरकारची योजना आहे. दरम्यान, सोबत काम करत हा प्रकल्प १५ महिन्यात पूर्ण करण्याची भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. यावेळीत राज्यभरातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.