Thane Crime : जादूटोणा केल्याच्या संशयावरून जळत्या निखाऱ्यावर चालायला लावले

जादूटोणाच्या संशयावरून एका वयोवृद्धाला गावकऱ्यांनी जळत्या निखाऱ्यावर चालण्याची अघोरी शिक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे उघडकीस आला आहे.

153
Thane Crime : जादूटोणा केल्याच्या संशयावरून जळत्या निखाऱ्यावर चालायला लावले
Thane Crime : जादूटोणा केल्याच्या संशयावरून जळत्या निखाऱ्यावर चालायला लावले

जादूटोणा केल्याच्या (Black Magic)संशयावरून एका वयोवृद्धाला गावकऱ्यांनी जळत्या निखाऱ्यावर चालण्याची अघोरी शिक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे (Kervele village in Murbad taluka)उघडकीस आला आहे. जळत्या निखाऱ्यावर चालणारा वयोवृद्ध गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुरबाड पोलिसांनी तात्काळ या अघोरी घटनेची नोंद घेऊन एका मंत्रिकासह ९ गावकऱ्यांवर जादूटोणा कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला असून ५ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी दिली. (Thane Crime)

(हेही वाचा- TikTok Ban in US : चिनी TikTok ला अमेरिकाही देणार दणका; काय घडले अमेरिकी संसदेत ?)

ठाणे जिल्हा मुरबाड तालुक्यातील मौजे करवेळे गावात लक्ष्मण बेडू भावार्थ (७२) हे मुलीसोबत राहण्यास आहे. लक्ष्मण हे गावात भुताटकी जादूटोणा करतात असा गावातील अनेकांना संशय होता. (Human Sacrifice, other Inhuman and Aghori Practices and Black magic) गावात घडत असलेल्या काही  विचित्र घटना लक्ष्मण भावार्थ हे घडवून आणत असल्याच्या संशयावरून गावातील काही गावकऱ्यांनी आसनगाव येथे राहणाऱ्या एका मांत्रिकाला गाठले, या मांत्रिकाने गावकऱ्याना गावात गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करायला सांगितला. (Thane Crime)

(हेही वाचा- Madrasa : उत्तर प्रदेशातील १३ हजार बेकायदा मदरसे बंद करण्याची शिफारस)

मंत्रिकांच्या सांगण्यावरून गावकऱ्यांनी ४ मार्च रोजी रात्रीच्या वेळी गावात गोंधळाचा कार्यक्रमाचे आयोजन केले, या गोंधळाच्या कार्यक्रमात मांत्रिकाने कोळसा पेटवून निखारे तयार करण्यास सांगितले आणि लक्ष्मण याला गोंधळात घेऊन या असा आदेश मांत्रिकाने गावकऱ्याना दिला. मांत्रिकाने तंत्रमंत्र बोलून जळते निखारे संपूर्ण जमिनीवर पसरवले. काही वेळाने गावकऱ्यांनी लक्ष्मण भावार्थ यांना घरातून उचलून गोंधळाच्या ठिकाणी आणले. त्यानंतर मंत्रिकाने लक्ष्मण यांना हळदकुंकू लावून त्याची पूजा करून त्याला बळजबरीने पेटत्या निखाऱ्यावर उभे करून त्याला निखाऱ्यावर बळजबरीने चालण्यास भाग पाडले. (Human Sacrifice, other Inhuman and Aghori Practices and Black magic) या सर्व अघोरी प्रकारामुळे लक्ष्मण भावार्थ हे घाबरले व त्यांच्या पायाला जळाल्याच्या गंभीर जखमा होऊन ते जमिनीवर निपचित पडले, लक्ष्मण हे निपचित पडल्यामुळे त्यांच्यातील भुताटकी गेली असा समज गावकऱ्यांना झाला, लक्ष्मण हे शुद्धीवर आल्यानंतर ते रुग्णालयात होते, त्यांनी घडलेला सर्व प्रकार आपल्या मुलीला सांगितला. (Thane Crime)

(हेही वाचा- Madrasa : उत्तर प्रदेशातील १३ हजार बेकायदा मदरसे बंद करण्याची शिफारस)

संशयाने पछाडलेल्या गावकऱ्यांनी वडिलांवर केलेल्या अघोरी प्रकारामुळे मुलीला धक्काच बसला, तीने ६ मार्च रोजी मुरबाड पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी तात्काळ या घटनेची नोंद घेऊन मंत्रिकासह ९ जणांविरुद्ध भादंवि कलम ४५२ (बेकायदेशीर घरात घुसने) , ३२४ ( दुखापत करणे), ३२३( मारहाण करणे) ३४१( प्रतिबंध करणे) आणि १४३,१४७(पाच पेक्षा अधिक जण मिळून दंगल घडवणे) सह महाराष्ट्र नरबळी इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करणे बाबत अधिनियम २०१३चे कलम ३  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Thane Crime)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.