TikTok Ban in US : चिनी TikTok ला अमेरिकाही देणार दणका; काय घडले अमेरिकी संसदेत ?

TikTok Ban in US : अमेरिकेत यापूर्वीही टिकटॉकवर बंदी घालण्याचा प्रयत्न झाला होता. गेल्या वर्षी रिपब्लिकन पक्षाने आणलेल्या एका विधेयकात टिकटॉकवर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता, याशिवाय सिनेटरने एक कायदाही आणला होता

97
TikTok Ban in US : चिनी TikTok ला अमेरिकाही देणार दणका; काय घडले अमेरिकी संसदेत ?
TikTok Ban in US : चिनी TikTok ला अमेरिकाही देणार दणका; काय घडले अमेरिकी संसदेत ?

चीनने देशाच्या विरोधात कुरघोड्या चालू केल्यानंतर भारताने २०२० मध्ये भारताने चिनी अ‍ॅप टिक-टॉकवर (TikTok) बंदी घातली होती. आता अमेरिकेतही या अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. (TikTok Ban in US)

अमेरिकन संसदेत (American Parliament) खासदारांनी मांडलेल्या विधेयकात चिनी कंपनी टिकटॉक अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. ‘द प्रोटेक्टिंग अमेरिकन्स फ्रॉम फॉरेन ॲडव्हर्सरी कंट्रोल्ड ॲप्लिकेशन्स अ‍ॅक्ट’मध्ये कंपनीवर चिनी कम्युनिस्ट पक्षाशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि अ‍ॅपमुळे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचा दावा करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : आढळराव राष्ट्रवादीत तर बारणे भाजपमधून निवडणूक लढवणार, शिंदेंच्या सेनेत आणखी राजकीय पेच वाढणार )

यापूर्वीही झाला होता बंदी घालण्याचा प्रयत्न

अमेरिकन संसदेत सादर झालेल्या विधेयकात टिक-टॉकचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. हे विधेयक अमेरिकेच्या शत्रू देशांच्या नियंत्रणाखाली असलेल्या प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यासाठी एक व्यापक फ्रेमवर्क तयार करते. वॉशिंग्टनने शत्रू देश म्हणून लेबल केलेल्या देशांमध्ये चीन, रशिया, इराण, उत्तर कोरिया आणि व्हेनेझुएला यांचा समावेश आहे.

अमेरिकेत यापूर्वीही टिकटॉकवर बंदी घालण्याचा प्रयत्न झाला होता. गेल्या वर्षी रिपब्लिकन पक्षाने आणलेल्या एका विधेयकात टिकटॉकवर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता, याशिवाय सिनेटरने एक कायदाही आणला होता, मात्र दोन्ही विधेयके मंजूर होऊ शकली नव्हती.

तुमचा अमेरिकेतील व्यवसाय बंद करा

‘हा माझा TikTok ला संदेश आहे, चीनी कम्युनिस्ट पार्टीसोबत (Communist Party of China) संबंध तोडा किंवा तुमचा अमेरिकेतील व्यवसाय बंद करा ! अमेरिकेतील एका मोठ्या मीडिया प्लॅटफॉर्मवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार आम्ही अमेरिकेच्या सर्वात मोठ्या प्रतिस्पर्ध्याला देऊ शकत नाही, असा इशारा हाऊस सिलेक्ट कमिटीचे अध्यक्ष आणि कायद्याच्या लेखकांपैकी एक, माईक गॅलाघर यांनी कंपनीला दिला आहे.

हे विधेयक सादर करणारे कृष्णमूर्ती म्हणाले की, रशिया असो किंवा सीसीपी, हे विधेयक हे सुनिश्चित करते की, राष्ट्रपतींना धोकादायक अ‍ॅपवर कारवाई करण्याचा आणि आमच्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध अमेरिकन लोकांची सुरक्षा आणि गोपनीयतेचे रक्षण करण्याचा अधिकार आहे. अमेरिकेत जर हे विधेयक मंजूर झाले, तर ByteDance कडे TikTok विकण्यासाठी फक्त ५ महिने असतील. जर कंपनी तसे करू शकली नाही, तर ते अमेरिकेतील Apple Store आणि Google Play Store वरून काढून टाकले जाईल. (TikTok Ban in US)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.