Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर शहापूरजवळ काम सुरु असतांना मोठा अपघात; आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

राज्याचे रस्ते विकास सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे घटनास्थळी दाखल

117
Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर शहापूरजवळ काम सुरु असतांना मोठा अपघात; आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावरील अपघातांची (Samruddhi Mahamarg Accident) मालिका सुरूच आहे. कधी चालकाच्या चुकीमुळे, तर कधी काम सुरु असतांना होणाऱ्या गडबडीमुळे तिथे सतत अपघात होतांना दिसतात. अशातच पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्याजवळील शहापूर तालुक्यातील सरलांबे इथं समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडली. पुलाचं काम सुरु असतांना गर्डर मशिन कोसळली. यामध्ये आत्तापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत. आणखी सहा जण गर्डर मशिनच्या खाली अडकल्याची शक्यता आहे. तसेच यामधील मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अपघाताची चौकशी केली जाईल

दरम्यान, राज्याचे रस्ते विकास सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी (Samruddhi Mahamarg Accident) भेट दिली. गर्डर मशिनखाली दाबले गेलेल्या कामगारांना बाहेर काढण्यास प्रथम प्राधान्य देत आहोत. ही दुर्घटना कशी झाली याची चौकशी केली जाईल. तसेच मतृांच्या कुटुंबीयांना मदत देखील केली जाईल असे दादा भुसे यांनी यावेळी सांगितले.

(हेही वाचा – Riot : हरियाणात दंगल; वाहनांची तोडफोड, इंटरनेट बंद, कलम १४४ लागू)

समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg Accident) तिसऱ्या टप्प्याचे काम सरु आहे. काल म्हणजेच सोमवार ३१ जुलै रोजी रात्रीही समृद्धी महामार्गाचे असेच काम सुरु होते, मात्र त्यावेळीच ही दुर्देवी घटना घडली आहे. शाहपूर सरलांबे येथे ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजूरांच्या अंगावर कोसळला. यामध्ये आतापर्यंत १७ मजुरांचा मृत्यू झाला आहे. हे मृतदेह शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात आणले आहेत. यामध्ये तीन ते चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. अशातच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनास्थळी (Samruddhi Mahamarg Accident) भेट देतील.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.