Ratnagiri: महामानव भागोजीशेठ कीर यांच्या स्मृतीस अभिवादन; पदयात्रा आणि सहभोजनाचे आयोजन

125
Ratnagiri: महामानव भागोजीशेठ कीर यांच्या स्मृतीस अभिवादन; पदयात्रा आणि सहभोजनाचे आयोजन
Ratnagiri: महामानव भागोजीशेठ कीर यांच्या स्मृतीस अभिवादन; पदयात्रा आणि सहभोजनाचे आयोजन

रत्नागिरीत (Ratnagiri) महामानव भागोजीशेठ कीर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शनिवारी, (२४ फेब्रुवारी) शिस्तबद्ध भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेस हजारो नागरिकांसह दुचाकीस्वारही सामील झाले होत. पदयात्रेचा शुभारंभ नवीनचंद्र बांदीवडेकर यांनी नारळ वाढवून केला. पदयात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर, भागोजी कीर आणि संत गडगे महाराज यांची छायाचित्रे रथात ठेवण्यात आली होती.

पदयात्रेनंतर सहभोजनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यकमास रत्नागिरीतील विविध राजकीय पक्षाचे तसेच सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मुंबई येथून अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकारी सदस्य पदयात्रा तसेच सहभोजन कार्यकमास उपस्थित होते.

(हेही पहा – Bmc Chief Engineer : अखेर महापालिकेचे १५ प्रभारी प्रमुख अभियंते झाले कायम )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.