Bmc Chief Engineer : अखेर महापालिकेचे १५ प्रभारी प्रमुख अभियंते झाले कायम

हिंदुस्थान पोस्टच्या वृत्तानंतर दीड वर्षांनंतर उपप्रमुख अभियंत्यांना मिळाली बढती

6437
Ashray Yojna : भायखळ्याच्या  टँक पाखाडी पुनर्विकासात ‘हाय रॉक’साठी बदलला बांधकामाचा आराखडा
Ashray Yojna : भायखळ्याच्या  टँक पाखाडी पुनर्विकासात ‘हाय रॉक’साठी बदलला बांधकामाचा आराखडा

सचिन धानजी,मुंबई

मुंबई महापालिकेचा (Bmc) कारभार हा  प्रशासकाच्या हाती असूनही महापालिकेतील (municipal corporation) प्रमुख अभियंता (Bmc Chief Engineer) पदे ही मागील दीड ते दोन वर्षांपासून प्रभारीच असून याबाबत हिंदुस्थान पोस्टने आवाज उठवल्यानंतर अखेर प्रमोशन कमिटीची (pramosion commity) बैठकीत स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील ११ आणि यांत्रिक व विद्युत विभागातील ४ उपप्रमुख पदावरील अभियंत्यांना प्रमुख अभियंतापदी (Bmc Chief Engineer) बढती देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या अनेक खात्यांच्या प्रमुख अभियंता पदी प्रभारी असलेल्या उपप्रमुखांना बढती मिळाल्याने ते त्याच्या पदी कायम झाले आहेत. तर अनेक उपप्रमुखपदावरील अधिकारी हे बढतीस पात्र असतानाही  त्यांना डावलून इतरांना प्रमुख अभियंता पदी प्रभारी म्हणून नेमले होते, त्यांना पायउतार व्हावा लागला आहे. त्यामुळे कोस्टल रोड, नागरी प्रशिक्षण केंद्र आणि मुंबई मल:निसारण प्रकल्प विभागाच्या प्रमुख अभियंता पदी या डावलल्या गेलेल्या अधिकाऱ्यांची वर्णी लागली गेली आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून प्रभारी असलेल्या प्रमुख अभियंत्यांच्या गळ्यात कायमपदाची माळ पडली आहे. (Bmc Chief Engineer)

(हेही वाचा- CM Eknath Shinde : राज्यातील तरूणांना कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे रोजगार देणार)

मुंबई महापालिकेच्या (Bmc) विकास व नियोजन विभाग (development planing), इमारत देखभाल विभाग, नगर अभियंता ,नागरी प्रशिक्षण केंद्र, रस्ते व वाहतूक विभाग, कोस्टल रोड ,पूल विभाग, यांत्रिक व विद्युत विभाग, पर्जन्य जलवाहिनी, जलअभियंता विभाग,  पाणी पुरवठा प्रकल्प, मलनि:सारण प्रकल्प, मुंबई मलनि:सारण प्रकल्प, मलनि:सारण प्रचालन, घनकचरा व्यवस्थापन आदींचे प्रमुख अभियंता पद हे मागील एक ते दीड वर्षांपासून रिक्त असून या पदावर कायम अधिकाऱ्याची नेमणूक करण्याऐवजी प्रशासनाने (Bmc Chief Engineer) आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याला प्रभारी म्हणून नेमणूक करून प्रमुख अभियंता पदाची जबाबदारी त्यांच्यावर नेमली असल्याची बाब हिंदुस्थान  पोस्टने ९ फेब्रुवारी रोजी वृत्त प्रकाशित केले होते. ‘मुंबई महापालिकेतील १५ प्रमुख अभियंत्यांची पदे रिक्त, प्रशासकांनी असाही नोंदवला महापालिकेत (municipal corporation) इतिहास’ या मथळ्या खाली वृत्त करत झोपेचे सोंग घेणाऱ्या प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या वृत्तानंतर सरकारी स्तरावर याची दखल घेऊन मागील आठवड्यात प्रमोशन कमिटीची (pramosion commity) बैठक घेऊन स्थापत्य अभियंता प्रवर्गातील  ११ प्रमुख अभियंतापदी आणि यांत्रिक व  विद्युत अभियंता प्रवर्गातील ४ अशाप्रकारे सेवा ज्येष्ठतेनुसार १५ उपप्रमुख अभियंत्यांना बढती देत त्यांची नियुक्ती प्रमुख अभियंता पदी केली. याबाबच्या प्रस्तावाला सोमवारी मंजुरी प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी खात्यांचे वाटप करून सर्वांचे नियुक्तीचे आदेश बजावण्यात आले आहे. (Bmc Chief Engineer)

हिंदुस्थान पोस्टने अभियंत्यांच्या बढती प्रकरणाला वाचा फोडून प्रभारी असलेल्या प्रमुख अभियंत्यांना कायम करण्यासाठी महत्वाची भूमिका निभावल्याने अभियंत्यांकडून कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. (Bmc Chief Engineer)

मात्र, प्रभारी प्रमुख अभियंतापदाचा प्रभारी भार सोपवलेल्या तीन उपप्रमुख अभियंत्यांवरील पदाचा भार काढून घेत त्यांच्याकडे उपप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे. तर नगर अभियंता, पूल विभाग आणि यांत्रिक व विद्युत विभागाच्या उपप्रमुख अभियंत्यांचा प्रमुख अभियंता पदासाठी आवश्यक असलेला कालावधी पूर्ण न झाल्याने त्यांना बढती देण्यात आली नाही, मात्र,त्यांच्याकड या खात्यांचा भार प्रभारी प्रमुख अभियंता म्हणून कायम राखला आहे. (Bmc Chief Engineer)

प्रमुख अभियंता पदावरील कायम अधिकाऱ्यांची नावे

विकास व नियोजन विभाग: सुनील राठोड

इमारत देखभाल विभाग: यतीन दळवी

नगर अभियंता : दिलीप पाटील(प्रभारी)

नागरी प्रशिक्षण केंद्र : गोंविद गारुळे

रस्ते व वाहतूक विभाग : मनिष पटेल

कोस्टल रोड  :  गिरीष निकम

पूल विभाग : विवेक कल्याणकर(प्रभारी)

यांत्रिक व विद्युत विभाग : कृष्णा पेरेकर (प्रभारी)

पर्जन्य जलवाहिनी : श्रीधर चौधरी

जलअभियंता विभाग : पुरुषोत्तम माळवदे

 पाणी पुरवठा प्रकल्प : पांडुरुंग बंडगर

मलनि:सारण प्रकल्प : शशांक भोरे

मुंबई मलनि:सारण प्रकल्प : राजेश ताम्हाणे

मलनि:सारण प्रचालन : प्रदीप गवळी

घनकचरा व्यवस्थापन : प्रशांत तायशेटे

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प : सुधीर परकाळे

दक्षता विभाग : अविनाश तांबेवाघ

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.