Devendra Fadnavis : महिला, युवा, शेतकरी आणि गरीब सर्वांचा मोदींच्या माध्यमातून सन्मान – देवेंद्र फडणवीस

139
Devendra Fadnavis : राहुल गांधी, ठाकरेंकडून महिला शक्तीचा वारंवार अवमान

महाराष्ट्रातील ज्या यवतमाळ जिल्ह्यात सीता मातेचे एकमेव मंदिर आहे, त्याच यवतमाळमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते महिलांसाठी नारी शक्ति वंदनेचा कार्यक्रम होत आहे. याचा अत्यंत आनंद होत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींच्या हातून साडेपाच महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणात फंड देऊन याची सुरुवात करत असल्याची आनंदाची गोष्ट असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल आहे. राज्य सरकारने लेक लाडकी, महिलांना 50 टक्के सवलत, अशा अनेक योजना सुरू केल्या असल्याचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा यवतमाळमध्ये पार पडला. या वेळी ते बोलत होते.

महिला, युवा, किसान आणि गरीब केवळ या चार जाती असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सांगतात. या चारही घटकांसाठी आजचा कार्यक्रम असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 4 हजार 700 कोटी रुपये आज थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जात असल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी आवास योजनेचा शुभारंभ देखील आज होत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या माध्यमातून दहा लाख कुटुंबीयांना स्वतःचं घर देण्यात येत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या घरावर महिलांचा मालकी हक्क देण्याचा आमचा प्रयत्न असल्याची घोषणा देखील फडणवीस यांनी यावेळी केली.

(हेही वाचा –Assam : काँग्रेसला हिमाचलनंतर आसाममध्येही झटका; तीन मोठ्या नेत्यांनी दिली सोडचिठ्ठी  )

यवतमाळ जिल्ह्यात तसेच विदर्भातील पाण्याचे रखडलेले प्रकल्प आता पूर्ण झाले – फडणवीस
कळमच्या गणपतीला आपण नमन करतो, आता तिथपर्यंत आपली रेल्वे पोहोचणार असून आज चतुर्थीचा दिवस असल्याची आठवण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली. यवतमाळ जिल्ह्यात तसेच विदर्भातील पाण्याचे रखडलेले प्रकल्प आता पूर्ण झाले आहेत. तर काही प्रकल्प हे प्रगतीपथावर आहेत. या सर्व प्रकल्पांना गती दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांच्या आभार मानले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.