Assam : काँग्रेसला हिमाचलनंतर आसाममध्येही झटका; तीन मोठ्या नेत्यांनी दिली सोडचिठ्ठी 

Assam : काँग्रेसचे आणखी एक कार्यकारी अध्यक्ष कमलाख्या डे पुरकायस्थ (Kamalakhya Dey Purkayastha) यांनीही नुकतेच काँग्रेसला राम-राम ठोकला आहे. आमदार बसंत कुमार दास यांनीही भाजप सरकारला पाठिंबा दिला आहे.

110
Assam : काँग्रेसला हिमाचलनंतर आसाममध्येही झटका; तीन मोठ्या नेत्यांनी दिली सोडचिठ्ठी 
Assam : काँग्रेसला हिमाचलनंतर आसाममध्येही झटका; तीन मोठ्या नेत्यांनी दिली सोडचिठ्ठी 

हिमाचल प्रदेशातील राज्यसभेच्या मतदानात क्रॉस वोटिंग झाल्याचे समोर आले असतांनाच आता आसाममध्येही (Assam) काँग्रेसला (Congress) मोठा झटका बसला आहे. आसामचे काँग्रेसचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष राणा गोस्वामी यांनी पक्ष सोडला आहे. राणा गोस्वामी (Rana Goswami) यांना भाजपकडून उमेदवारी मिळू शकते, यामुळेच ते भाजपमध्ये जाणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे. (Himachal Pradesh)

(हेही वाचा – Dongri Unauthorized Building : डोंगरीमधील लक्ष्मी इमारतीतील अनधिकृत बांधकामाला जबाबदार कोण?)

तीन मोठ्या नेत्यांनी दिली काँग्रेसला सोडचिठ्ठी 

काँग्रेसचे आणखी एक कार्यकारी अध्यक्ष कमलाख्या डे पुरकायस्थ (Kamalakhya Dey Purkayastha) यांनीही नुकतेच काँग्रेसला राम-राम ठोकला आहे. आमदार बसंत कुमार दास यांनीही भाजप सरकारला पाठिंबा दिला आहे. अशा प्रकारे आसाममध्ये एकामागून एक तीन मोठ्या नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. राणा गोस्वामी यांनी भाजपाच्या केंद्रीय नेत्यांची आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचीही भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

राणा गोस्वामी यांनी केसी वेणुगोपाल यांना याविषयी पत्र लिहिले आहे. पत्रात म्हटले आहे की, मी आसाम (Assam) काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. याशिवाय काँग्रेसचा सक्रीय कार्यकर्ता म्हणूनही जबाबदारी सोडत आहे.

राणा गोस्वामी हे प्रभावी नेते

राणा गोस्वामी हे दोन वेळा काँग्रेसचे आमदार राहिले आहेत. यामुळे त्यांना 2026 च्या विधानसभा निवडणुकीतही जोरहाट मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते.

2021 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 126 पैकी केवळ 29 जागाच मिळाल्या होत्या. मात्र, हा नंबर काही वेळातच घटून 27 झाला होता. या दोन्ही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ते पुन्हा निवडून आले. (Himachal Pradesh)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.